जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

बिग बॉस 14 मध्ये सोमवारच्या भागात मोठा धमाका बघायला मिळणार आहे. अर्शी खान आणि रुबीना दिलैक यांच्यातही मोठा हंगामा बघायला मिळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:10 PM, 11 Jan 2021
Bigg Boss 14

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये सोमवारच्या भागात मोठा धमाका बघायला मिळणार आहे. अर्शी खान आणि रुबीना दिलैक यांच्यातही मोठा हंगामा बघायला मिळणार आहे. नुकताच एक बिग बॉसचा प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात येतो. त्यावेळी विकास अर्शीचे नाव घेतो तर अली राखीचे नाव घेतो. मात्र, या टास्कमध्ये सर्वात जास्त टार्गेट रूबीना दिलैकला करण्यात आले असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून काल जास्मीन बेघर झाली आहे. त्यावेळी घरातील सर्व वातावरण भावनिक झाले होते. (Bigg Boss 14 Ali Goni trolls on social media)

जास्मीन घरातून गेल्यामुळे अली खूप रडताना दिसला यावेळी घरातील सर्व सदस्य अलीला समजवत होते. मात्र, अली ज्याप्रकारे जास्मीन घराच्या बाहेर गेल्यानंतर रडला हे पाहून अलीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. ट्रोलर्सचे म्हणणे होते की, तो अ‌ॅक्टिंग करत होता.

सलमान खान वीकेंड वॉरमध्ये रूबीनाची क्लाॅस लावतो सलमान म्हणतो की, अशाप्रकारे बोट दाखवण्याचा अर्थ नेमका काय आहे यावर सलमान अभिनवला विचारतो की, यांचा अर्थ काय होतो मात्र, अभिनवला पण याबद्दल काहीही माहीती नाही. सलमान घरातील इतर सदस्यांना देखील विचारतो त्यावेळी अर्शी म्हणते की, याचा अर्थ म्हणजे रूबीना संपूर्ण घराला तिच्या बोटावर नाचवत आहे. मात्र, यावेळी रूबीना म्हणते की, हे चुकीचे आहे आणि रूबीना सलमान खानला म्हणते यावर मी काही बोलू का? पण सलमान रूबीना काही बोलण्याची संधी देत नाही.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

(Bigg Boss 14 Ali Goni trolls on social media)