AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; ‘तुला पाहते’मध्ये तीन पिढ्यांची गोष्ट

अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या 'तुला पाहता' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटातून त्या बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहेत. या चित्रपटात तीन पिढ्यांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.

निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; 'तुला पाहते'मध्ये तीन पिढ्यांची गोष्ट
निशिगंधा वाडImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2026 | 1:30 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे, आनंद काळे, दीपाली विचारे, मानसी पाटील, नचिकेत लेले, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे आणि आकाश शिंदे अशी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, अशा कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण जोडपं स्वतःची ओळख, नातेसंबंध, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा अनेक भावनिक, सामाजिक आणि वैचारिक स्तरांवर संघर्ष उभे राहतात. ‘तुला पाहता’ ही याच पार्श्वभूमीवर आधारित एक रंजक, संवेदनशील आणि समकालीन कथा आहे. या कथेत तीन पिढ्या एकत्र दिसतात आणि त्यांच्या नात्यांमधील गाठी न ताणता, त्या कशा अलगद सोडवल्या जाऊ शकतात, याचा सुंदर प्रवास या चित्रपटातून उलगडतो. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मयुरा प्रधान यांचं आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या, “हा चित्रपट अत्यंत समकालीन आणि काळाला अनुरूप आहे. पिढ्यांमधली वीण कुठेही गाठ न बसता, सगळ्या गाठी कशा सोडवल्या जातात, ही या कथेची फार सुंदर बाजू आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडली. मयुरा हिचा मी या चित्रपटात असावं हा आग्रह होता आणि तो मला मोडता आला नाही. इतक्या वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपट करताना एखादी भूमिका पूर्णपणे माझी असावी असा आग्रह असू शकला असता, पण मयुराने ज्या पद्धतीने कथा सांगितली आणि भूमिका समजावली, त्यामुळे मी लगेच या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. एका चांगल्या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.”

या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘तुला पाहता’ या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना