
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाचा इंट्रो व्हिडीओ 3 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘रामायणम्’ असं मूळ नाव असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा श्रीराम यांच्या आणि दाक्षिणात्य अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या भूमिकेची एक छोटीशी झलकसुद्धा या व्हिडीओमध्ये पहायला मिळाली. त्याचसोबत चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. कोणता कलाकार रामायणमधील कोणतं पात्र साकारणार, हे स्पष्ट करण्यात आलं. ‘रामायणम्’च्या या छोट्याशा टीझरने तुफान चर्चा घडवून आणली आहे. परंतु यामध्ये लपलेल्या 7 गोष्टींकडे तुमचं लक्ष गेलंय का?
‘रामायणम्’च्या या इंट्रो व्हिडीओमद्ये जो टेम्प्लेट दाखवला गेलाय, त्यात अनेक हिंट आणि सीन्सची माहिती मिळते. टेम्प्लेटमधील एका दृश्यात कबंध नावाचा एक डोळा असलेला राक्षस दाखवण्यात आला आहे. तो एक शापित गंधर्व सैनिक होता, जो सीतेच्या शोधात असलेल्या राम-लक्ष्मण यांना दिसतो. तेव्हा श्रीराम त्याला मुक्त करतात.
टेम्प्लेटमध्ये रावणाचा भाऊ कुंभकरणाचीही एक झलक पहायला मिळते. कुंभकरण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा असायचा.
राम आणि रावण यांच्यात जे युद्ध झालं, त्याचीही झलक या टेम्प्लेटमध्ये दाखवण्यात आली आहे.
एका सीनमध्ये हनुमानाचंही रुप दाखवलं गेलंय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे.
एका टेम्प्लेंटमध्ये सीता स्वयंवरदरम्यानचं दृश्य दाखवलं गेलंय. ज्यामध्ये श्रीराम हे महादेवांचं धनुष्य तोडतात.
एका सीनमध्ये सीतेला पंचवटीमध्ये हरिणासोबत दाखवलं गेलंय. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे.
याशिवाय जेव्हा रावण सीतेला लंकेच्या दिशेने घेऊन जात असतो, तेव्हा जटायू आणि रावण यांच्यात झालेलं युद्धही एका टेम्प्लेंटमध्ये दाखवण्यात आलं आहे. या युद्धादरम्यान रावण जटायूचे पंख छाटतो.
‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि साई पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. यासाठी तो शाकाहारी जेवण जेवतोय आणि दररोजचा त्याचा वर्कआऊट रुटीनसुद्धा बदलला आहे.