Niti Taylor : तुला माझ्यासोबत…दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Niti Taylor : टीव्ही अभिनेत्री निती टेलरनं कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

‘कैसी ये यारियाँ’ या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळवलेली निती टेलर अलीकडेच ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. ती अंतिम फेरीत पोहोचली, पण जिंकू शकली नाही. नितीनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजनपूर्वी, तिनं आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत केली. तिचा पहिला चित्रपट हिट झाला, पण तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी सोडली.
निती टेलरनं आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून स्वतःला दूर का केलं, याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्रीनं खुलासा केला की, तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउचचा सामना करावा लागला, ज्यामुळे तिनं ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. नितीनं खुलासा केला की, तिच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं विचित्र मागणी केलेली.
निती टेलरला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला
निती टेलरने हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं कास्टिंग काउचच्या घटनेबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं की, ‘ज्या दिग्दर्शकासोबत माझा पहिला चित्रपट होता, त्यानं चित्रपट पूर्ण झाल्यावर मला दुसऱ्या चित्रपटासाठी बोलावलं. मग तो म्हणाला, ‘यावेळी तुला माझ्यासोबत झोपावं लागेल.’ अशा वेळी काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाही. मी लगेच फोन ठेवला, त्याचा नंबर ब्लॉक केला आणि माझ्या आईला फोन करून म्हणाले, ‘कल्पना कर, तो म्हातारा माणूस असा बोलतोय.’
अभिनेत्रीने असंही सांगितलं की, त्या दिग्दर्शकानं इतर अभिनेत्रींसोबतही असंच करण्याचा प्रयत्न केला होता. ‘मी त्याला इतर मुलींसोबत पाहिलं होतं, पण तो माझ्यासोबत असा प्रयत्न करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर मी ठरवलं की, मी पुन्हा कधीही चित्रपट करणार नाही. हे सगळं ऐकून मला धक्का बसला आणि मी त्याचा नंबर ब्लॉक केला. मी याबद्दल कोणालाच सांगितलं नाही, कारण मला काय करावं हे कळत नव्हतं. तुम्ही अचानक अशा परिस्थितीत सापडता.’
३ तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं
निती टेलरनं तिच्या करिअरची सुरुवात २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या, त्रिनाधा राव नकिना दिग्दर्शित ‘मेम वयसुकु वचम’ या तेलुगू चित्रपटातून केली. त्यानंतर ती ‘पेल्ली पुस्तकम’मध्ये दिसली. तिचा शेवटचा तेलुगू चित्रपट ‘लव्ह डॉट कॉम’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला.
नितीने वयाच्या १५ व्या वर्षी ‘प्यार का बंधन’ या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तिला २०१४ च्या ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेतून ओळख मिळाली. ती शेवटची ‘बडे अच्छे लगते हैं २’ मध्ये दिसली होती.
