AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi: नोराच्या तोंडून चुकून निघाले असे शब्द, जे ऐकून नेटकरी उडवतायत तिची खिल्ली!

नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत नोराच्या तोंडून चुकून असे शब्द निघाले, जे ऐकून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. तिचा हा व्हिडीओ पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Nora Fatehi: नोराच्या तोंडून चुकून निघाले असे शब्द, जे ऐकून नेटकरी उडवतायत तिची खिल्ली!
Nora FatehiImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2023 | 1:52 PM
Share

मुंबई: आपल्या दमदार नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चर्चेत आहे. नुकतंच तिने कोर्टात आरोपी सुकेश चंद्रशेखरविरोधात जबाब नोंदविला. यादरम्यान नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत नोराच्या तोंडून चुकून असे शब्द निघाले, जे ऐकून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. तिचा हा व्हिडीओ पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये नोरा फतेहीचा फोटो काढण्यासाठी पापाराझींमध्ये एक चाहतासुद्धा आहे. नोराचे फोटो क्लिक करताना तो चाहता अचानक पडतो. त्यानंतर नोरा त्याची मदत करते. इथपर्यंत तरी सर्व ठीक होतं मात्र त्यानंतर नोरा जे म्हणाली, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

‘संभल के गिरो’ (सांभाळून पड) असं नोराच्या तोंडून चुकून निघालं. याच गोष्टीवरून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. ‘भावा, जरा सांभाळून खाली पड’, अशी उपरोधिक कमेंट एका युजरने केली. तर ‘आधी थोडं प्लॅनिंग कर आणि मग जरा सांभाळून पड. असं अचानक कोण खाली पडतं’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘सांभाळून खाली पड जरा, जरा दुखापत तरी होऊ दे’, अशीही मस्करी नेटकऱ्यांनी केली.

पहा व्हिडीओ-

गेल्या काही दिवसांपासून नोरा मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. नुकताच तिने तिहार तुरुंगात असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखरविरोधात जबाब नोंदविला. माझी गर्लफ्रेंड होण्यास तयार असशील तर मी तुला बंगला, आलिशान गाड्या आणि सर्व सोयीसुविधा देईन असं आमिष सुकेशने दाखविल्याचं नोरा म्हणाली.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर