Saiyaara : अहान-अनीत नव्हे, 250 कोटींच्या ‘सैय्यारा’मध्ये झळकणार होतं हे रिअल लाईफ कपल
Saiyaara First Choice : एकीकडे, सैय्यारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटाने अवघ्या 11 दिवसांत भारतात 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा यांचे नशीब त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून चमकले आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. पण तुम्हाला माहित आहे का की सैयारा साठी निर्मात्यांची पहिली पसंती अहान आणि अनीत पड्डा नव्हे तर एक रिअल लाइक सेलिब्रिटी कपल होतं, ज्यांनी आधीच एकत्र सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

अवघ्या 11 दिवसांत भारतात 250 कोटींचा टप्पा ओलांडून ‘सैय्यारा’ हा चित्रपटवर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित या रोमँटिक ड्रामाने, त्याच्या ताज्या जोडीने आणि अद्भुत साउंडट्रॅकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, फार कमी लोकांना माहिती असेल की या चित्रपटासाठी पहिली पसंती अहान आणि अनित नव्हती तर एक वास्तविक जीवनातील पॉवर कपल या चित्रपटासाठी निवडणार होते.
एका रिपोर्टनुसार, ‘सैयारा’साठी निर्मात्यांची पहिली पसंती खऱ्या आयुष्यातील जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघे होते. याआधी, ‘शेरशाह’ मध्ये या दोघांची ऑनस्क्रीन अद्भुत केमिस्ट्री दिसली होती, त्यांनी केवळ मनं जिंकली नाहीत तर बॉक्स ऑफिसवरही त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. निर्मात्यांनी अहान आणि अनितची निवड करण्यापूर्वी या कपलशी संपर्क साधला होता, परंतु त्यांच्याशी सूर जुळू शकले नाहीत.
नवीन स्टार निवडण्याचा धोका पत्करला
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक मोहित सुरी याने कास्टिंग प्रक्रियेबद्दल सांगितले. निर्माता आदित्य चोप्रा यांनी जेव्हा सल्ला दिला तेव्हा ते स्टारकास्ट निवडण्याचा विचार करत होते हे त्याने कबूल केले. मोहित सुरीने आदित्यचं वक्तव्य सांगितलं. “तुमचा चित्रपट हा खूप ओळखीच्या चेहऱ्यांसह चालणार नाही, ही दोन तरुणांची कथा आहे. नवीन चेहरे कास्ट केले पाहिजेत,” असा सल्ला आदित्यने देण्यात आला. आजच्या बॉक्स ऑफिसच्या वातावरणात असा धोका कोण पत्करेल असे विचारले असता आदित्या चोप्रा म्हणाले “मी (धोका) पत्करेन.”
मोहित सुरी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी यापूर्वी 2014 सालच्या ‘एक व्हिलन’ या हिट चित्रपटामध्ये एकत्र काम केले असले तरी, मोहित सुरी हा इमरान हाश्मी, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर सारख्या त्यांच्या विश्वासू कलाकारांसोबत काम करण्यासाठी देखील ओळखले जातो. त्यांच्या यशस्वी इतिहास पाहता, सिद्धार्थचे ‘सैयारा’ मध्ये एकत्र येणे हे जवळजवळ निश्चितच होते, परंतु नवीन कलाकारांच्या कास्टिंगमुळे खेळ बदलला.
11 दिवसांत 250 कोटींची कमाई
सैय्यारा या चित्रपटाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, ‘या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडीत काढले. फक्त 11 दिवसांत, या चित्रपटाने भारतात 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रचंड लोकप्रियता आणि सातत्यपूर्ण प्रेक्षकांच्या संख्येमुळे, हा रोमँटिक चित्रपट आठवड्याच्या अखेरीस सहजपणे 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे .
