AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini | धर्मेंद्रच नाही तर ‘या’ ३ अभिनेत्यांनी हेमा मालिनी यांना केलं प्रपोज; सर्वांसोबत रोमान्स पण…

धर्मेंद्र - हेमा मालिनी यांचं लग्न झाल्यानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला बसला मोठा धक्का; एकाने तर लग्नचं केलं नाही, हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं झालं निधन

Hema Malini | धर्मेंद्रच नाही तर 'या' ३ अभिनेत्यांनी हेमा मालिनी यांना केलं प्रपोज; सर्वांसोबत रोमान्स पण...
| Updated on: Jul 09, 2023 | 1:15 PM
Share

मुंबई | जेव्हा भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन अभिनेत्रींची चर्चा रंगते, तेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी यांचं नाव अव्वल स्थानी असतं. आजही हेमा मालिनी यांचं अभिनय आणि सौंदर्य चाहते विसरु शकलेले नाहीत. हेमा मालिनी यांनी त्यांच्या काळत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. हेमा मालिनी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर, अनेक सेलिब्रिटींना देखील घायाळ केलं. हेमा मालिनी यांच्या सोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी इच्छुक असायचे. हेमा मालिनी यांनी देखील बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्यांसोबत त्यांच्या नावाची देखील चर्चा झाली. पण अखेर अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत हेमा मालिनी यांच लग्न झालं. पण फक्त धर्मेंद्र यांनीच नाही तर, आणखी तीन प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हेमा मालिनी यांना प्रपोज केलं होतं. आज हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेवू..

मीडिया रिपोर्टनुसार, एक वेळ अशी होती, जेव्हा अभिनेते संजीव कुमार यांचं देखील हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला होता. संजीव कुमार यांनी संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांच्यावर प्रेम केलं. पण घरच्यांनी दोघांच्या नात्याला नकार दिला. अशात संजीव कुमार यांनी आयुष्यात लग्नच केलं नाही. वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

संजीव कुमार यांच्या शिवाय अभिनेते राजकुमार यांनी देखील हेमा मालिनी यांना प्रपोज केला होता. पण हेमा मालिनी यांनी राजकुमार यांना स्पष्ट नकार दिला. राजकुमार हेमा मालिनी यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते. पण ड्रिम गर्लच्या मनावर मात्र प्रसिद्ध सेलिब्रिटीने राज्य केलं होतं.

यशाच्या शिखरावर चढत असताना हेमा मालिनी यांचं नाव अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. जितेंद्र यांना देखील हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचं होतं. जितेंद्र यांनी देखील हेमा मालिनी यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. पण तेव्हा हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र रिलेशनशिपमध्ये होते.

पण धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे हेमा मालिनी यांना अनेक अडचणी येत होत्या. याच दरम्यान, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना फोन केला आणि तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेल… असं म्हणाले. धर्मेंद्र यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता हेमा मालिनी यांना होकार दिला.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झाल्यामुळे जितेंद्र यांना मोठा धक्का बसला. हेमा मालिनी आणि जितेंद्र अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसले. हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्रसोबत अभिनेत्रीच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही धर्मेंद्र यांच्या घराची पायरी हेमा मालिनी चढल्या नाहीत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.