
Hema Malini – Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं… राहत्या घरीच धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
देओल कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. पण धर्मेंद्र यांच्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि आहाना दिसल्या नाही. हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरात धर्मेंद्र यांच्यासाठी पूजा ठेवली होती…
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांत हेमा मालिनी यांना पतीला भेटू देखील दिलं नाही… धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हेमा मालिनी यांना पतीसोबत राहायचं होतं.. ही पहिली वेळ नाही जेव्हा हेमा मालिनी यांनी देओल कुटुंबापासून वेगळं ठवण्यात आलं… याआधी देखील असं अनेकदा झालं आहे.
दिग्गज अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या मुलाचं 18 जून 2023 रोजी मोठ्या थाटात लग्न झालं. देओल कुटुंबातील मुलाच्या लग्नात अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण लग्नात किंवा लग्नापूर्वीच्या विधींमध्ये धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि सनी देओल यांच्या सावत्र आई हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत.
शिवाय हेमा मालिनी यांच्या वाढदिवशी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीमध्ये देखील फक्त धर्मेंद्र उपस्थित होते. सनी देओल आणि बॉबी देओल पार्टीत दिसले नाही. त्यामुळे तेव्हा देखील धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील वाद समोर आले.
धर्मेंद्र यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यामुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 43 वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी तडजोड करत आयुष्य जगत आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची शेवटची भेट देखील झाली नाही… असं देखील सांगण्यात येत आहे.