AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिटार, फाटलेली जीन्स अन्…; शर्टलेस सलमान खानची सुरुवात पहिल्यांदा कधी झालेली? आयकॉनिक लूकमागची भन्नाट कहाणी

‘ओ ओ जाने जाना’ आणि सलमान खानचा शर्टलेस लूक आजही 90s च्या चाहत्यांच्या आठवणीत कायम आहे. पण या गाण्याची निर्मिती आणि सलमानचा आयकॉनिक लूक यामागे एक रंजक किस्सा आहे.

गिटार, फाटलेली जीन्स अन्...; शर्टलेस सलमान खानची सुरुवात पहिल्यांदा कधी झालेली? आयकॉनिक लूकमागची भन्नाट कहाणी
SALMAN KHAN SONGSImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 04, 2026 | 9:33 PM
Share

हातात गिटार, फाटलेली जीन्स, हवेवर उडणारे सिल्की केस आणि त्याचा शर्टलेस लूक त्याचा तो आयकॉनिक लूक …काय मग आठवलं की नाही ते गाणं, वाजली की नाही डोक्यात धून? होय त्याबद्दलच बोलतोय आपण ओ ओ जाने जाना या गाण्याबद्दल. पण तुम्हाला माहित आहे का हे गाणे नेमके कसे तयार झाले? सलमानचा तो शर्टलेस लूक फेमस कसा झाला?

ओ ओ जाने जाना हे गाणं आधीच रेकॉर्ड करण्यात आलं होतं. या गाण्याचे मूळ गायक जतिन – ललित नसून १९९५ मध्ये कमाल खान यांनी हे गाणे लिहीले होते आणि produce ही केले होते. त्यानंतर हे गाणे लंडनमधे प्रचंड गाजले. त्याचवेळी दिग्दर्शक सोहिल खान प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची तयारी करत होते,तेव्हा त्यांनी कमाल खान चे हे गाणे ऐकले होते. त्यांना ते गाणे प्रचंड आवडल्याने आपल्या नव्या सिनेमात त्यांनी ते गाणे वापरण्याचे ठरवले. सरळ गाणे घेता येत नव्हते. त्यामुळे जतिन – ललितने ओरिजीनल गाण्याला अधिक जोशीले केले, त्यात रिमिक्सिंग आणि मिक्सरिंग केले याशिवाय काही नवीन ओळी तयार सुद्धा जोडल्या. मग काय सोहिल खान यांच्याकडे गाण्याचे सर्व हक्क आले. सलमानचा तो आयकॉनिक लूक आणि हे नवे रिमिक्सिंग गाणे यामुळे भारतील पॉप संगीतात एक नवा पाया रचण्यात आला.

90s च्या काळात “मेने प्यार किया”हा सिनेमा रिलीझ झाला आणि प्रत्येकाच्या डोळ्यात सलमानचा तो लूक बसला आणि तोंडात ओ ओ जाने जाना हे गाणं त्याचसोबत सलमानचा एक नवा लूकही चाहत्यांना दिसला. तो लूक चाहत्यांना इतका आवडला की ती स्टाईल तो लूक सलमानची ओळखच बनून केला. त्या काळात सलमानची प्रचंड क्रेझ होती. सगळ्या तरूणांना त्या लूकचे वेड लागले, आणि रस्त्यात सलमानचा लूक फॉलो करणारी ती पोरं जिकडं तिकडं दिसायची. पण त्या लूकसाठी सर्वात गरजेची होती ती सलमान सारखी बॉडी. पोरं अक्षरक्ष: वेडी झाली, सलमानसारखी बॉडी मिळवण्यासाठी कित्येक पोरांनी व्यायाम करायला सुरूवात केली होती

पोरीच काय पोर पण फिदा झाली सलमानच्या त्या शर्टलेस लूकवर. पण तुम्हाला शर्टलेस लूक हा आधीपासून ठरलेला नव्हता. या गाण्यासाठी सलमानसाठी शर्ट शिवण्यात आला होता पण असा काही घोळ झाला कि सलमानला शर्टलेसच गाणं शूट करावं लागलं. शूटिंगच्या वेळी त्याच्यासाठी खास तयार करण्यात आलेला शर्ट ऐनवेळी त्याला व्यवस्थित झालाच नाही.त्यावेळी त्याचं शरीर खूप मस्क्यूलर झालं होतं. त्यामुळे तयार करण्यात आलेला शर्ट त्याला खूप घट्ट होत होता.

आता काय करायचं? हा प्रश्न सर्वांसमोर पडला.शूटिंगच ठिकाणही शहरापासून खूप लांब होतं. त्यामुळे ताबडतोब नवीन शर्ट खरेदी करणे किंवा शिवणे अशक्य होतं. त्यामुळे शर्टशिवायच शूट करायचं ठरलं.सलमानही शर्टलेस लूकसाठी तयार झाला. कॅमेऱ्याच्या मॉनिटरवर शॉट पाहताच सर्वांना सलमानचा हा लूक आवडला आणि तोच लूक सलमानचा ट्रेडमार्क शर्टलेस लूक ठरला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात