बिपाशा बसू पुन्हा सलमान खान याच्यासोबत रोमान्स करणार? ‘या’ चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत
बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. 2022 मध्ये बिपाशा बसू हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अनेकदा मुलीसोबत सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना बिपाशा बसू ही दिसते. काही दिवसांपूर्वीच बिपाशा बसू हिने तिच्या मुलीची झलक चाहत्यांना दाखवली होती.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नाहीयेत. बाॅलिवूडचे चित्रपट (Movie) फ्लाॅप जात असताना दुसरीकडे साऊथचे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. अक्षय कुमार, आमिर खान अशा मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांचे तर एका मागून एक चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट सहावा फ्लाॅप जाणारा चित्रपट आहे. आमिर खान याचा देखील बहुचर्चित लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान (Aamir Khan) हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सतत बाॅलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवताना प्रेक्षक हे दिसत आहेत.
बाॅलिवूड चित्रपट निर्माते हे गेल्या काही दिवसांपासून सतत रीमेक आणि सीक्वल चित्रपटांवर अधिक भर देताना दिसत आहेत. साऊथ चित्रपटांचे रिमेक चित्रपट हे मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. 2023 च्या सुरूवातीला बोनी कपूर हे नो एंट्री चित्रपटाच्या सीक्वलबद्दल बोलताना दिसले होते. नो एंट्री हा चित्रपट 2005 ला रिलीज झाला होता आणि या चित्रपटाने धमाका केला.
नो एंट्री चित्रपटात सलमान खान, बिपाशा बसू, फरदीन खान, लारा दत्ता, सेलिना जेटली, ईशा देओल, अनिल कपूर, बोमन ईरानी अशी मोठे स्टार होती. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार बिपाशा बसू ही नो एंट्री चित्रपटातून आता बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे काय तर नो एंट्रीमध्ये परत एकदा सलमान खान याच्यासोबत रोमान्स करताना बिपाशा बसू ही दिसणार आहे.
एका रिपोर्टनुसार सलमान खान हा टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग पुर्ण करून काही दिवस छोटासा ब्रेक घेईल आणि लगेचच नो एंट्री चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल. आता या रिपोर्टनंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला होता.
विशेष म्हणजे सलमान खान हा किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. सलमान खान याच्या या चित्रपटातून बिग बाॅस फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी यांनी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट दिवाळीमध्ये चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कतरिना कैफ आणि सलमान खान या चित्रपटात दिसणार आहेत.
