Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grammy Awards Postponed: ‘ग्रॅमी अवॉर्ड’ला ओमिक्रॉन चा मोठा फटका, जानेवारीत होणारा पुरस्कार सोहळा लांबणीवर!

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणाऱ्या 64वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards Postponed) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर असे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेऊन लवकरच या कार्यक्रमाचे पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे.

Grammy Awards Postponed: ‘ग्रॅमी अवॉर्ड’ला ओमिक्रॉन चा मोठा फटका, जानेवारीत होणारा पुरस्कार सोहळा लांबणीवर!
Grammy Awards
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 10:00 AM

मुंबई : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणाऱ्या 64वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards Postponed) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर असे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेऊन लवकरच या कार्यक्रमाचे पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे.

‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता 31 जानेवारीला हा सोहळा आयोजित करण्यात मोठा धोका आहे. शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर, रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने 64वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’

पाह पोस्ट :

गतवर्षी मार्चमध्ये पार पडला सोहळा

गेल्या वर्षीही कोरोनामुळे हा सोहळा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे सन्मानित केले जाते.

2021 च्या सुरुवातीच्या मोठ्या पुरस्कारांप्रमाणे, कोरोनाव्हायरसमुळे ग्रॅमी पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी, कॉन्सर्ट स्टेपल्स सेंटरऐवजी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोकळ्या मैदानी सेटवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन वेगवेगळे स्टेज तयार करण्यात आले आणि सेलिब्रिटींच्या बसण्याची जागाही बदलण्यात आली. याशिवाय प्रेक्षकांची आसनक्षमताही कमी झाली होती.

बियॉन्से आणि टेलर स्विफ्टसाठी ही एक मोठी संगीतमय रात्र होती. लाइव्ह परफॉर्मन्समुळे, ग्रॅमी स्वतःला इतर अवॉर्ड शोपेक्षा वेगळे सिद्ध करतो. मात्र, गेल्या वर्षी गर्दीमुळे लाईव्ह परफॉर्मन्सला ब्रेक लागला होता. या दिग्गज गायकांनी रंगमंचावर आपली उपस्थिती लावली होती, पण त्यांच्या सादरीकरणाची गाणी आधीच रेकॉर्ड झाली होती आणि स्टेजवर टेप वाजवल्या गेल्या होत्या.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.