Video | ‘देवदास’ची ‘पारो’ बनून अंकिता लोखंडेचा डान्स, ‘पवित्र रिश्ता 2’च्या शूटिंग दरम्यान दिसला अभिनेत्रीचा नवा अवतार!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा चाहत्यांसोबत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अंकिता अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे आणि तिचे सोशल मीडिया प्रोफाईल पाहून हे चांगलेच लक्षात येते.

Video | ‘देवदास’ची ‘पारो’ बनून अंकिता लोखंडेचा डान्स, ‘पवित्र रिश्ता 2’च्या शूटिंग दरम्यान दिसला अभिनेत्रीचा नवा अवतार!
Ankita Lokhande

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा चाहत्यांसोबत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अंकिता अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे आणि तिचे सोशल मीडिया प्रोफाईल पाहून हे चांगलेच लक्षात येते.

अलीकडेच, ती ‘देवदास’ चित्रपटातील ‘सिलसिला ये चाहत का’ गाण्यावर नाचताना दिसली होती. हा व्हिडीओ खुद्द अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट केला होता. ‘पारो’ बनलेल्या अंकिताचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. व्हिडीओ क्लिपमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीसह हिरव्या बांगड्या घालून कशी सुंदर नृत्य करत आहे, हे दिसते आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

हा व्हिडीओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘माझ्यासोबत व्हॅनिटी अफेअर.’ वास्तविक तिने हे नृत्य तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये केले आहे. सोशल मीडिया वापरकर्ते अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘पवित्र रिश्ता 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अंकिता लवकरच ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये ‘अर्चना’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतूनच तिला भरपूर लोकप्रियता मिळाली होती. पहिल्या सीझनमध्ये अंकिता आणि सुशांत सिंह राजपूतच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेत दिवंगत अभिनेत्याने ‘मानव’ची भूमिका साकारली होती. ता या नव्या सीझनमध्ये अभिनेता शाहीर शेख ‘मानव’ची भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात!

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बऱ्याच दिवसांपासून विकी जैनला (Vicky Jain) डेट करत आहे. ती विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडते आणि दोघांनीही लवकरच लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, अलीकडेच अंकिताचा सहकलाकार शाहीर शेखने (Shaheer Sheikh) अंकिताच्या लग्नाबद्दल अशी कमेंट केली की ऐकून चाहतेही खूश होतील.

वास्तविक, शाहीर आणि अंकिता त्यांच्या आगामी शो ‘पवित्र रिश्ता 2’चे प्रमोशन करत आहेत. तर, अलीकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शाहीरने अंकिताच्या लग्नाबद्दल एक कमेंट केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला सर्वांसमोर शट अप म्हटले. असे काहीतरी घडले की, पवित्र रिश्ता 2 नंतर अंकिताला तिच्या पुढील योजनांबद्दल विचारण्यात आले. अंकिता म्हणते की, सध्या तिच्याकडे या शो नंतर काहीच काम हातात नाहीय. नेमकं तेव्हाच शाहीर मधेच म्हणाला की, राहू दे यार, तू लग्न करत आहेस.

अंकिताने शाहीरला केले गप्प

हे ऐकून अंकिता हैराण झाली आणि म्हणाली, ‘तू वेडा आहेस का? गप्प बस… नाही नाही असे काही नाही.’ यानंतर, शाहीर आपला मुद्दा स्पष्ट करताना म्हणतो की, ‘अरे मला काही माहित नाही… मी जे सांगितले ते विसरून जा.’

यानंतर अंकिता म्हणते की, ‘मी सध्या काहीच करत नाहीय. होय, पण फेब्रुवारीपासून मी काहीतरी नवीन सुरू करू शकते.’ अंकिता आणि विकी 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा :

‘हृतिक रोशन के घर सीलन?’, घरातील ओल पकडलेल्या भिंतीला पाहून चाहतीचा प्रश्न, उत्तर देताना हृतिक म्हणतो…

अबब! पाय मोजांचा झाला क्रॉप टॉप, तर अर्ध टी-शर्ट बनलं जॅकेट, ‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेदची नवी फॅशन!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI