Bigg Boss OTT Confirmed Contestants : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ते टीव्ही शो क्वीन दिव्या अग्रवाल, ‘हे’ स्पर्धक दिसणार बॉलिवूडच्या घरात!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 08, 2021 | 9:39 PM

‘बिग बॉस’चा (Bigg Boss OTT) नवा सीझन पुन्हा वूटवर सुरू झाला आहे. यावेळी या सीझनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सहा आठवड्यांसाठी, रिअॅलिटी शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर धमाल करण्यास सज्ज झाला आहे आणि हा सीझन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर होस्ट करत आहे.

Bigg Boss OTT Confirmed Contestants : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ते टीव्ही शो क्वीन दिव्या अग्रवाल, ‘हे’ स्पर्धक दिसणार बॉलिवूडच्या घरात!
BB Contestant

Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस’चा (Bigg Boss OTT) नवा सीझन पुन्हा वूटवर सुरू झाला आहे. यावेळी या सीझनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सहा आठवड्यांसाठी, रिअॅलिटी शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर धमाल करण्यास सज्ज झाला आहे आणि हा सीझन प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर होस्ट करत आहे. चला तर, जाणून घेऊया या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक दिसणार?

दिव्या अग्रवाल

दिव्या अग्रवालने यापूर्वी स्प्लिट्सविला, ऐस ऑफ स्पेस आणि रोडीजसारखे रिअॅलिटी शो केले आहेत. दिव्याने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली. दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती स्प्लिट्सविला सीझन 11च्या स्पर्धक प्रियांक शर्माची एक्स गर्लफ्रेंड होती. पण सध्या ती ‘खतरों के खिलाडी’ स्पर्धक वरुण सूदला डेट करत आहे. अलीकडेच तिने स्वतःचे फॅशन लेबल देखील लाँच केले आहे.

राकेश बापट

राकेश बापट हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. ‘तुम बिन’ आणि ‘दिल विल प्यार व्यार’सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर राकेशने ‘सलोनी का सफर’, ‘मर्यादा: लेकिन कब तक?’, ‘होंगे जुदा ना हम’ आणि ‘कुबूल है’ असे लोकप्रिय टीव्ही शो केले. तो शेवट कलर्स टीव्ही शो ‘इश्क मैं मरजावाँ’मध्ये दिसला होता. राकेशने मे 2011 मध्ये अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्न केले. मात्र, फेब्रुवारी 2019 मध्ये दोघे वेगळे झाले.

नेहा भसीन

गायिका नेहा भसीन हिने आपल्या गायनाने हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. ‘दिल की गलान’ (अनप्लग्ड), ‘चाशनी रीप्राईज’ आणि ‘जग घुमेया’ (अनप्लग्ड) सारखी नेहाची गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.

झीशान खान

झीशान खानने अलीकडेच मुंबई विमानतळावर बाथरोबमध्ये फिरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. झीशान लोकप्रिय टीव्ही ड्रामा शो ‘कुमकुम भाग्य’चा एक भाग राहिला आहे, ज्यामध्ये श्रिती झा आणि शबीर अहलुवालिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या शोमध्ये त्याने आर्यन खन्नाची भूमिका साकारली होती.

रिद्धिमा पंडित

रिद्धिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’ या शोमुळे प्रसिद्ध झाली. या मालिकेत तिने सुपर ह्युमनॉइड रोबोटची भूमिका केली होती. अभिनय करण्यापूर्वी, 31 वर्षीय अभिनेत्रीने दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये मॉडेलिंग केले होते. तिचा शो ऑफ एअर गेल्यानंतर रिद्धिमा ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये दिसली. ती ‘खतरों के खिलाडी सीझन 9’ या रिअॅलिटी शोची सेकंड रनरअप राहिली आहे.

मिलिंद गाबा

गायक मिलिंद गाबा सध्या पंजाबी आणि बॉलिवूड संगीत विश्वाचा एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. ‘नजर लग जाएगी’, आणि ‘यार मोड दो’ सारख्या गाण्यांमुळे मिलिंद चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. मिलिंदने मिका सिंग, गिप्पी ग्रेवाल, भूमी त्रिवेदी यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे.

करण नाथ

अभिनेता करण नाथने मिस्टर इंडियामधून (1987) बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘ये दिल आशिकाना’ (2002) मध्ये तो रोमँटिक हिरोची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. करण मॅडनेस, एलओसी कारगिल, तुम – अ डेंजरस ऑब्सेशन आणि तेरा क्या होगा जॉनी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवट ‘गन्स ऑफ बनारस’मध्ये गुड्डू म्हणून दिसला होता. त्याचे वडील राकेश नाथ यांनी दिल तेरा आशिक सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि त्याची आई एक यशस्वी लेखिका होती.

उर्फी जावेद

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जन्मलेल्या 25 वर्षीय उर्फी जावेदचे सोशल मीडियावर 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. उर्फीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘ए मेरे हमसफर’सारखे शो केले आहेत.

निशांत भट्ट

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सामील झालेला निशांत भट्ट एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. डान्स रिअॅलिटी शोसाठी त्याने अनेक सेलिब्रिटींना कोरिओग्राफ केले आहे. निशांत सुपर डान्सर चॅप्टर 3चा विजेता कोरिओग्राफर आहे. तो ‘झलक दिखला जा’ मधील अंकिता लोखंडे हिचाही नृत्यदिग्दर्शक होता.

अक्षरा सिंह

लोकांना भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह खूप आवडते. ती भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने 2010च्या अॅक्शन ड्रामा सत्यमेव जयतेमध्ये रवि किशनच्या बरोबरीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने बिग बॉस 13 स्पर्धक खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांच्यासोबत काम केले आहे. यापूर्वी अक्षरा ‘काला टीका’, ‘पोरस’, ‘सेवा वाली बहू’सारख्या टीव्ही शोचाही भाग राहिली आहे.

प्रतीक सहजपाल

दिल्लीच्या प्रतीक सहजपालने डेव्हिटी रिअॅलिटी शो लव्ह स्कूल सीझन 3 सह चित्रपट जगतात प्रवेश केला. त्याने 2018 मध्ये रोडीज एक्सट्रीमसाठी ऑडिशनही दिले, परंतु न्यायाधीशांना प्रभावित करू शकले नाही. यानंतर त्याने Ace of Space मध्ये भाग घेतला. तो आणि पवित्र पुनिया यांनी काही काळ एकमेकांना डेट केले.

मुस्कान

20 वर्षीय मुस्कान सोशल मीडियावर मूस जट्टाना म्हणून ओळखली जाते. ती मोहाली, चंदीगड येथील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. मुस्कानने तिचे शिक्षण ऑस्ट्रेलियामध्ये केले आहे. अहवालानुसार, तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :

 ‘बिग बॉस’च्या घराचा पारा वाढणार! यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘या’ बोल्ड बाला!

काही वेळातच ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI