Bigg Boss OTT | काही वेळातच ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

आज म्हणजेच 8 ऑगस्टपासून 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) सुरू होणार आहे. हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ चालणारा म्हणजेच 6 महिन्यांचा हा सीझन असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे.

Bigg Boss OTT | काही वेळातच ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?
Bigg Boss

मुंबई : आज म्हणजेच 8 ऑगस्टपासून ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) सुरू होणार आहे. हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ चालणारा म्हणजेच 6 महिन्यांचा हा सीझन असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे. ओटीटीवर सहा आठवडे लाईव्ह दाखवल्यानंतर, या शोचे काही स्पर्धक सलमान खानच्या ‘बिग बॉस’ हाऊसमध्ये जातील. आजच्या दिवशी 12 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत आणि पहिल्यांदा सलमान खान नाही, तर करण जोहर यावेळी बिग बॉस स्पर्धकांचे स्वागत करताना दिसणार आहे. चला तर, मग जाणून घेऊया प्रेक्षक बिग बॉस OTT कुठे आणि कसे पाहू शकतात.

‘बिग बॉस ओटीटी’चा प्रीमिअर वूट सिलेक्ट अॅपवर आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. आजपासून दररोज हा शो 7 वाजता वूट अॅपवर दाखवला जाईल. परंतु, दर रविवारी तो 7 च्या ऐवजी 8 वाजता प्रसारित केला जाईल. पण, हा शो पाहण्यासाठी तुम्हाला वूट अॅपची सदस्यता घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त वूट सिलेक्टवरच्य बिग बॉस ओटीटी पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सदस्यता खरेदी केल्यानंतर, तुम्ही हा शो मोबाईल, लॅपटॉप आणि तुमच्या स्मार्ट टीव्हीवर पाहू शकता.

24 तास लाईव्ह!

सामन्यतः बिग बॉसच्या घराचे काही भागाचे थेट प्रसारण चाहत्यांसाठी केले जाते. पण यावेळी हा शो 24 तास लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. OTT वर असल्याने, काही बोल्ड कंटेंट देखील या शोमध्ये दाखवले जाऊ शकतात. शोचे अनेक प्रोमो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते प्रोमो बघून एक गोष्ट सांगता येईल की, फक्त अभिनेतेच नाही तर यावेळी बिग बॉस ओटीटीमध्ये अनेक वेगवेगळ्या व्यवसायातील लोक दिसणार आहेत.

बिग बॉसमध्ये कोणा-कोणाचा समावेश?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शमिता शेट्टी (Shamita Shetty), राकेश बापट (Raquesh Bapat), उर्फी जावेद (Urfi Javed), मुस्कान जटाटा (Muskan Jatata), कोरियोग्राफर निशांत भट्ट Choreographer Nishant Bhatt), दिव्या अग्रवाल (Divya Agarwal), रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit), भोजपुरी एक्ट्रेस अक्षरा सिंह (Bhojpuri Akshara Singh), सिंगर मिलिंद गाबा (Singer Milind Gaba) यांसारखे अनेक बडे सेलिब्रिटी यावेळी बिग बॉस ओटीटी घरात सहभागी होणार आहेत.

(Bigg Boss OTT The new season of ‘Bigg Boss’ is coming to the audience in a short time, find out when and where you can watch it)

हेही वाचा :

प्रीमिअर आधीच ‘बिग बॉस’च्या आलिशान घराची सफर!, करण जोहरने फिल्मी स्टाईलमध्ये घेतली एंट्री!

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI