Bigg Boss OTT | प्रीमिअर आधीच ‘बिग बॉस’च्या आलिशान घराची सफर!, करण जोहरने फिल्मी स्टाईलमध्ये घेतली एंट्री!

चाहते टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त आणि मजेदार रिअॅलिटी शो 'बिग बॉस'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि आता बिग बॉस ओटीटी काही तासांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो त्याच्या नवीन डिजिटल आवृत्तीमुळे गेला बराच काळ चर्चेत आला आहे.

Bigg Boss OTT | प्रीमिअर आधीच ‘बिग बॉस’च्या आलिशान घराची सफर!, करण जोहरने फिल्मी स्टाईलमध्ये घेतली एंट्री!
BB OTT

मुंबई : आजकाल टीव्हीवर रिअॅलिटी शो तेजीत आहेत. गायन आणि नृत्य व्यतिरिक्त, इतर अनेक रिअॅलिटी शो आहेत, जे प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करत आहेत. त्याचबरोबर चाहते टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त आणि मजेदार रिअॅलिटी शो ‘बिग बॉस‘ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि आता बिग बॉस ओटीटी काही तासांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो त्याच्या नवीन डिजिटल आवृत्तीमुळे गेला बराच काळ चर्चेत आला आहे.

आता प्रीमिअर आधीच होस्ट करण जोहरने या घराची फिल्मी सफर चाहत्यांना घडवली आहे. या आलिशान घरात राहण्यासाठी अनेक बडे कलाकार स्पर्धा करणार आहेत.

शोचा धमाकेदार प्रोमो

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर शो होस्ट करणार आहे. मात्र, शो सुरू होण्यापूर्वी करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक अतिशय रोचक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. करण जोहरने चाहत्यांना ‘कभी खुशी कभी गम’ स्टाईलमध्ये या घराचे दर्शन घडवले आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना करण जोहरने लिहिले की, ‘आता प्रतीक्षा संपणार आहे, या ओटीटी जगात माझी पहिली पायरी. तू आणि मी एकत्र खूप मजा करू.’  आता घराचा हा लूक आणि करण जोहरचे शब्द ऐकल्यानंतर चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणखीच उत्सुक झाले आहेत.

बिग बॉस ओटीटी मागील सर्व सीझनपेक्षा वेगळा असणार आहे. चाहते बिग बॉस ओटीटी ‘व्हूट’वर 24 तास पाहू शकणार आहेत. हा शो OTT वर प्रवाहित केला जात आहे आणि पहिल्यांदा करण जोहर या शोचा एक भाग असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा शो पूर्वीपेक्षा जास्त धमाकेदर आणि अधिक स्फोटक बनवला गेला आहे.

अलीकडेच बिग बॉसच्या घराचे फोटोही प्रेक्षकांसमोर आली होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमंग यांनी यावेळी घराचा संपूर्ण लूक डिझाईन केला आहे. त्याच वेळी, त्याने घराचा डिजिटल लूक लक्षात घेऊन उत्तम प्रकारे डिझाइन केले गेले आहे.

यावेळी रिद्धिमा पंडित, करण नाथ, जीशान खान, नेहा भसीन, अक्षरा सिंह सारखे सेलेब्स शो मध्ये घराचे सदस्य बनतील. हा शो 8 ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, ज्याचे सूत्रसंचालन करण जोहर करणार आहे. आता हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत यशस्वी होतो, हे पाहावे लागेल.

(Bigg Boss OTT Karan Johar Enters in bb house to take a quick tour of this grand house watch video)

हेही वाचा :

ऑडीओ बुकच्या माध्यमातून पुन्हा ऐकता येणार लालन सारंग आणि विनय आपटेंचा आवाज!

चित्रपटच नाही तर, ‘या’ व्यवसायांमधूनही बक्कळ कमाई करतो बॉलिवूडचा ‘दबंग’ खान!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI