Salman Khan Net Worth | चित्रपटच नाही तर, ‘या’ व्यवसायांमधूनही बक्कळ कमाई करतो बॉलिवूडचा ‘दबंग’ खान!

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सलमानने अनेक हिट चित्रपट दिले आणि आता देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याचे नाव झळकत आहे. त्याचे चित्रपट कोट्यवधी रुपये कमवतात आणि प्रेक्षकांच्या हृदयावर एक वेगळी छाप सोडतात.

Salman Khan Net Worth | चित्रपटच नाही तर, ‘या’ व्यवसायांमधूनही बक्कळ कमाई करतो बॉलिवूडचा ‘दबंग’ खान!
सलमान खान

मुंबई : बॉलिवूड कलाकारांची कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. चित्रपट स्टार्सचे सर्व चित्रपट नेहमीच सुपरहिट होतील असे नाही. म्हणूनच, जवळजवळ प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्याचा स्वतःचा असा एक साईड बिझनेस असतो. ते जाहिराती, फोटोशूट आणि सोशल मीडिया शेअरिंग करून पैसे कमवतात आणि त्यांचे पैसे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवतात. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने लघु व्हिडीओ अॅप ‘चिंगारी’मध्ये गुंतवणूक केली आहे. सलमान ‘चिंगारी’चा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे.

सलमान खान आमच्यासोबत जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे या भागीदारीने स्पार्कला नवीन उंचीवर नेता येईल, असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

सलमानची दमदार बॉलिवूड कारकीर्द

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सलमानने अनेक हिट चित्रपट दिले आणि आता देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याचे नाव झळकत आहे. त्याचे चित्रपट कोट्यवधी रुपये कमवतात आणि प्रेक्षकांच्या हृदयावर एक वेगळी छाप सोडतात. 22 वर्षांहून अधिक काळ सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे आणि आलिशान जीवन जगत आहे.

सलमानची कमाई

सलमानचा स्वतःचा एक ब्रँड आहे, ज्याचे नाव ‘बीइंग ह्यूमन’ असे आहे. हा एकच नाही तर, तो इतर अनेक ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे, ज्यासाठी तो 8 ते 10 कोटी इतके मानधन आकारतो. एक काळ असा होता, जेव्हा सलमानची पहिली कमाई अवघी 75 रुपये इतकी होती, पण आता तो दरमहा कोट्यावधी कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान एका चित्रपटासाठी 60 कोटी रुपये घेतो. पण, अनेक चित्रपटांसाठी त्याला याहूनही जास्त फी मिळाली आहे. सलमानची निव्वळ संपत्ती सुमारे 360 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 2304 कोटी रुपये आहे.

लक्झरी आयुष्य जगतो अभिनेता!

सलमान खानच्या घराबद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या अपार्टमेंटचे नाव गॅलेक्सी आहे, जे मुंबईतील वांद्रे परिसरात आहे आणि इथे तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. याशिवाय सलमानने 2017 मध्ये मुंबईत 5BHK बंगलाही खरेदी केला आहे. एवढेच नाही, तर अनेक मीडिया रिपोर्ट्स असे सांगतात की, सलमानने दिल्ली, चंदीगड आणि नोएडा सारख्या ठिकाणी भरपूर प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. सलमानकडे अनेक लक्झरी कारही आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस, ऑडी, मर्सिडीज, बेंटले सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. त्यांची एकूण किंमत सुमारे 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

(Salman Khan Net Worth Dabangg Khan earns crores of rupees not only from movies but also from these businesses)

हेही वाचा :

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ म्हणत ‘ही’ अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

अनिरुद्ध देशमुखशी घटस्फोटानंतर ‘आई’ बदलणार? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI