AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

नव्वदच्या दशकातली ‘टुणूक टुणूक टून’, ‘बोलो ता रा रा..’, ‘हो जायेगी बल्ले बल्ले..’ ही गाणी आजही रसिकांना तितकीच आवडतात आणि ती अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. या उडत्या चालीच्या गाण्यांना आवाज देणारे गायक आहेत ‘दलेर मेहंदी’.

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!
रंग दे बसंती
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 9:42 AM
Share

मुंबई : नव्वदच्या दशकातली ‘टुणूक टुणूक टून’, ‘बोलो ता रा रा..’, ‘हो जायेगी बल्ले बल्ले..’ ही गाणी आजही रसिकांना तितकीच आवडतात आणि ती अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. या उडत्या चालीच्या गाण्यांना आवाज देणारे गायक आहेत ‘दलेर मेहंदी’. आपला गाण्यांमुळे त्यांनी अल्पावधीतच बरीच लोकप्रियता कमावली होती. त्यांची गाणी आजही अनेक कार्यक्रमांत वाजवली जातात.

गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी आपल्या दमदार आवाजाने आमिर खानच्या ‘रंग दे बंसंती’ या चित्रपटाचं मुख्य गाणं अर्थात ‘रंग दे बसंती’ (Rang De Basnti) गायलं होतं. या गाण्याचा एक किस्सा त्यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.

फिरता फिरता ए आर रहमान यांचा फोन आला!

दलेर मेहंदी एकदा आपल्या गाडीवरून घराजवळच्या परिसरात फेरफटका मारत होते. इतक्यात त्यांना ए आर रहमान यांचा फोन आला. ए आर रहमान यांनी त्यांना चेन्नईला येऊन आपल्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याविषयी विचारणा केली. त्यावर दलेर मेहंदी याने म्हटले की, तुम्ही पहिला गाणे ऐकवा, मला ते आवडलं तरच मी ते गाण्याचा विचार करेन.’ यानंतर ए आर रहमान यांनी त्यांना फोनवरच गाणं ऐकवलं. ही गाणं होतं ‘रंग दे बसंती’! गाण्यचे बोल आवडल्याने दलेर मेहंदी यांनी होकार दिला.

दोन तासांत रेकॉर्ड झाले गाणे!

यानंतर दलेर मेहंदी चेन्नईला गेले. तिथे ते थेट ए आर रहमान यांच्या स्टुडीओतच पोहचले. एरव्ही त्यांना सगळं आटोपून रेकॉर्डिंग करण्यात सामान्यतः 12 तास सहज लागायचे. मात्र, दलेर मेहंदी ही वेळेच्या बाबतीत काहीसे अधिक आग्रही असल्याने रहमान स्वतः त्यादिवशी अवघ्या अर्धा तासात स्टुडीओमध्ये पोहोचले. त्यानंतर केवळ दोन तासांत ‘रंग दे बसंती’ या गाण्याची रेकॉर्डींग पूर्ण झाली. यानंतर दलेर मेहंदी रहमान यांना अम्हणले की, मी गाण्यात माझ्या दोन ओळी आणि धून टाकू इच्छित आहे. मी त्या रेकॉर्ड करतो, तुम्हा पटल्या तर ठेवा अन्यथा काढून टाका. पण मी त्या गाणार आहे.

आणि गाण्याला नवीन झळाळी मिळाली!

दलेर मेहंदी यांनी दिलेली धून होती या गाण्याची सुरुवातीची म्युझिक… ‘आहा आहा आहा आहा, है है है डींग डींग डींग डींग डींग.. आहा आहा..’ याच संगीताने आणि दोन ओळींनी या गाण्याला सुपरहिट बनवलं. आजही हे गाणं वाजू लागलं की सुरुवातीची धून रसिकांना त्यांच्यावर ठेका धरायला भाग पाडते.

(Aamir Khan Starrer Rang De Basanti Song title Music Daler Mehndi ‘s addition makes this song super hit)

हेही वाचा :

नव्या प्रवासाची सुरुवात, सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन

जेव्हा एका गाण्यामुळे एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज होतात! वाचा ‘छोड दो आँचल’ गाण्याचा किस्सा

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.