Savaniee Ravindrra : नव्या प्रवासाची सुरुवात, सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. (The beginning of a new journey, Singer Savanie Ravindrra blessed with baby girl)

Savaniee Ravindrra : नव्या प्रवासाची सुरुवात, सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन

मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सावनीनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. सावनीनं डोहाळे जेवणाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. आता सावनीला कन्या रत्न प्राप्त झाला आहे.

सावनीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन 

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. नुकतंच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म

गरोदरपणाची बातमी देताना सावनीनं माध्यमाला सांगितलं होतं की, ‘माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली आहेत. तर काही गाणी लवकरच रिलीज होणार आहेत. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळानं मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे. अशी भावना तिनं व्यक्त केल्या आहेत.

आपल्या सुमधुर आवाजाने सावनी ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करते. सावनीने मराठीसह हिंदी आणि दक्षिणात्य भाषांमध्येही गाणी गायली आहेत. ती गोड गळयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा असते.
संबंधित बातम्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI