‘कमिंग बॅक होम वाली फीलिंग’, ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन!

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते.

'कमिंग बॅक होम वाली फीलिंग', ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन!
हृता दुर्गुळे

मुंबई : आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून, ही मालिका 30 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. हृताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यानांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हंटल आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

मलिकचे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही, तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही.

‘वेब विश्वात’ हृताचं पदार्पण

कोरोना काळात लोक घरबसल्या ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच सध्या वेब सीरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.सध्या मराठीमध्येही एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारी एक नवीन वेब सीरीज बनत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डुएट’ ही माझी पहिलीच वेब सीरीज असून, या वेब सीरीजबद्दल मी खूप एक्सायटेड आहे, असे हृता दुर्गुळे म्हणाली.

‘कोव्हिडचे सर्वच नियम पाळत अनेक महिन्यांनी शूट सुरु करत आहोत आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांमध्ये आहे. मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडेल’, अशी आशा हृताने व्यक्त केली आहे.

या वेब सीरीजमधल्या तिच्या सहकलाकराचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी, मराठी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता तिच्यासोबत या वेब सीरीजमध्ये काम करत असल्याचे कळते आहे. ‘ओपनिंग फ्रेम मीडिया’ या निर्मिती संस्थेद्वारे या वेब सीरीजचे दिग्दर्शन ‘स्ट्रॉबेरी शेक’ फेम दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर करत आहेत.

(Actress Hruta Durgule playing lead character in upcoming new serial Mann Udu Udu zaal)

हेही वाचा :

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ म्हणणार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’, नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI