Lock Up Show : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’चा टीझर आऊट, ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कंगना रनौतचा नवा रिअ‍ॅलिटी शो 'लॉक अप' येत्या 27 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाचा टीझर रिलिज झालाय.

Lock Up Show : कंगना रनौतच्या लॉकअपचा टीझर आऊट, या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कंगना रनौत-लॉकअप
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 4:07 PM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) एक नवा शो येऊ घातलाय. ज्याचं नाव आहे, ‘लॉक अप‘.(Lock Up) या शोचं कंगना अँकरिंग करणार आहे. एकता कपूरचा (Ekta Kapoor) हा नवा कार्यक्रम Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम येत्या 27 फेब्रुवारीपासून रसिकांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचा टीझर रिलिज झालाय. यात कंगना हटके अंदाजात पहायला मिळतेय. टीझरमधून कंगनाच या कार्यक्रमाची ‘क्विन’ असणार असं दिसतंय. या लॉकअपमध्ये 16 सदस्य असणार आहेत. आणि तेही कॉट्रोव्हर्सीतले मास्टर असणार असल्याची घोषणा कंगनाने केली आहे. कंगना पहिल्यांदाच हा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. कंगना तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. आता तिचा हा रिअॅलिटी शोदेखील चर्चेत आहे.

लॉकअपचा टीझर

कंगना रनौतचा नवा रिअ‍ॅलिटी शो ‘लॉक अप’ येत्या 27 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा टीझर सध्या प्रदर्शित झालाय. या टीझरमध्ये कंगना तिच्या ‘क्विन’ अंदाजात वावरताना दिसतेय. यात ती तिच्या भोवतीच्या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दलही बोलताना दिसतेय. तसंच ती नेपोटिझमबद्दलही बोलली आहे. MX Player आणि Alt Balaji यांनी आपल्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

कंगनाची इन्स्टाग्राम पोस्ट

‘लॉक अप’ या शोचा टीझर आऊट झालाय. अभिनेत्री कंगना रनौतनेही तिच्या इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे. याला तिने “क्विन का जेल है ऐसा, ना चलेगी भाईगिरी ना पापा का पैसा” असं कॅप्शन दिलं आहे.

कंगना रनौत आणनि एकता कपूर या दोघींनी ‘शूट आऊट वडाळा’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतरचा ‘जजमेंटल है क्या’ हा सिनेमा तिकीटबारीवर चालला नाही पण त्यामुळे कंगना-एकताची मैत्री घट्ट झाली. ‘थलायवी’ बघितल्यावर एकतानं कौतुक केलं होतं.

कंगना पहिल्यांदाच करणार कार्यक्रम होस्ट

कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पुहायला मिळणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या

अलिया म्हणते, ‘आम्ही लग्न केलंय’, खरचं लग्न झालय का ? जाणून घ्या

‘अंधाराच्या हाका’ आता ऐका ‘स्टोरीटेल’वर, रहस्य आणि उत्कंठेने भरलेली कथा अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गायत्री दातारचं म्युझिकल गिफ्ट, ‘नको हा बहाणा’म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार