AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंधाराच्या हाका’ आता ऐका ‘स्टोरीटेल’वर, रहस्य आणि उत्कंठेने भरलेली कथा अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात

'स्टोरीटेल मराठी'ने खास आपल्या रसिकांसाठी उत्कंठा आणि रहस्य चाळविणाऱ्या "अंधाराच्या हाका" या 'स्टोरीटेल ओरीजनल' ऑडीओबुकची निर्मिती केली आहे. अभिनेता सुव्रत जोशीच्या सहजसुंदर श्राव्यभिनायातून ही कथा प्रेक्षकांना भेटते.

‘अंधाराच्या हाका’ आता ऐका 'स्टोरीटेल'वर, रहस्य आणि उत्कंठेने भरलेली कथा अभिनेता सुव्रत जोशीच्या आवाजात
सुव्रत जोशी- अंधाराच्या हाका
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 1:17 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : ‘स्टोरीटेल मराठी’ने खास आपल्या रसिकांसाठी उत्कंठा आणि रहस्य चाळविणाऱ्या “अंधाराच्या हाका” (Andharachya Haka) या ‘स्टोरीटेल ओरीजनल’ ऑडीओबुकची निर्मिती केली आहे. या ऑडिओबुकद्वारे मराठी श्राव्यरसिकांना आकर्षित करण्यासाठी नवा ‘सुपर हिरो’ येणार आहे. “अंधाराच्या हाका” नावाप्रमाणेच रसिकांचे कुतूहल वाढविणारे असून ‘स्टोरीटेल’वर (Storytel Original) हे ऑडिओबुक चाहत्यांची उत्कंठा वाढविण्यासोबतच त्यांना गहन आणि थरारक अनुभूती देणार आहे. अष्टपैलू युवा अभिनेता सुव्रत जोशीच्या (Suvrat Joshi) सहजसुंदर श्राव्यभिनायातून आणि लेखक संवेद गळेगावकर यांच्या मांडणीतून ‘अंधाराच्या हाका’ मधील नायक अगस्त्य मुझुमदार सुष्ट आणि दुष्ट शक्तींना गुंगारा देत त्यांचा कसा सामना करतो, हे ऐकणे रंजक ठरणार आहे. “या ऑडिओबुकसाठी आम्ही उत्सुक आहोत”, असं अभिनेता सुव्रत जोशी म्हणाला.

‘अंधाराच्या हाका’ या अत्यंत वेगळ्या ऑडिओ बुकचे लेखक संवेद गळेगावकर म्हणतात, “हे माझं तिसरं पुस्तक स्टोरीटेलवर आलंय. या निमित्तानं जन्म आणि मृत्यु यांच्या दरम्यान अडकलेल्या विदेहींशी संवाद साधु शकणारा एक नवा नायक, अगस्त्य मुझुमदार, श्रोत्यांसमोर येत आहे. ऐन मध्यरात्री उमटणाऱ्या अमानविय आकृत्या, पडक्या वाड्यातून ऎकू येणारी कुजबुज, पावलांची उरफाटी सरसर यांचे रंगतदार किस्से न ऎकलेला माणूस विरळाच. अज्ञाताची भिती माणसाला कायमच आकर्षित करत आलेली आहे. आपल्या गुढकथा, भयकथांमधून रत्नाकर मतकरी, नारायण धारप ते थेट आताच्या हृषिकेश गुप्ते यांनी हे काहीसं काळं- करडं जग चांगलंच रंगवलेलं आहे. ‘अंधाराच्या हाका’च्या निमित्तानं अगस्त्य मुझुमदारपण आता या जगात पाऊल टाकत आहेत. निव्वळ सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा सामना अश्या टेम्ल्पेटाईज्ड कथांपलीकडे जाऊन अगदी विदेही पात्रांच्याही भावभावना मांडणं हा या कथांमधला आव्हानात्मक भाग. मायभुलीचे जाळे मधली मातृभावनेनं पछाडलेली विदेही असो किंवा भला बुरा है मधला निर्घृणतेच्या टोकाशी पोचलेला बुर्रा असो, “अंधाराच्या हाका”मधला हरैक विदेही पात्रात तुम्हाला मानवी स्वभावाच्या छटा सापडतील आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे.”

ऑडीओबुक माध्यमात नॅरेटर फार महत्वाची भुमिका बजावतो. गूढकथा लेखनात संवेद गळेगावकर यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांच्या ‘माया महा ठगनी’साठी लीना भागवत आणि आता “अंधाराच्या हाका”साठी सुव्रत जोशीसारखे रंगमंचावरचे कसलेले कलाकार लाभल्याने त्यांच्या या ऑडिओबुक्सना स्टोरीटेलवर विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

“अंधाराच्या हाका” साठी सुव्रतनं प्रत्येक टप्प्यावरचा अगस्त्य कमाल उभा केलाच आहे पण तुम्हाला मनापासून घाबरायचं असेल तर रात्रीच्या अंधारात सुव्रतनं उभे केलेले ‘विदेही’ एकट्यानं ऎकून बघाच असा सल्ला लेखक संवेद गळेगावकर यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गायत्री दातारचं म्युझिकल गिफ्ट, ‘नको हा बहाणा’म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार

कर्नाटक हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी, म्हणाली, हिंमत असेल तर अफगानिस्तानात…

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.