चिमुकल्या दोस्तांसाठी ‘छोटा भीम’ची खास सिंगापूर सफर, घरबसल्या करता येणार परदेश वारी!

सिंगापुर टुरिझम बोर्ड (एसटीबी) व्हूट किड्स आणि ग्रीन गोल्ड अॅनिमेशन यांच्या साथीने सुप्रसिद्ध भारतीय कॉमिक कॅरेक्टर छोटा भीम (Chhota Bhim) भारतीय प्रेक्षकांना सिंगापूरच्या व्हर्च्युअल साहस सफरीवर नेणार आहे.

चिमुकल्या दोस्तांसाठी ‘छोटा भीम’ची खास सिंगापूर सफर, घरबसल्या करता येणार परदेश वारी!
छोटा भीम

मुंबई : सिंगापुर टुरिझम बोर्ड (एसटीबी) व्हूट किड्स आणि ग्रीन गोल्ड अॅनिमेशन यांच्या साथीने सुप्रसिद्ध भारतीय कॉमिक कॅरेक्टर छोटा भीम (Chhota Bhim) भारतीय प्रेक्षकांना सिंगापूरच्या व्हर्च्युअल साहस सफरीवर नेणार आहे. घरातच आत सुरक्षित राहत उन्हाळी सुट्टी सुरु असेलेल्या आणि घरून अभ्यास करत असलेल्या मुलांना आणि कुटुंबांना गुंतवून ठेवण्यासाठी ‘छोटा भीम– अॅडव्हेन्चर्स इन सिंगापूर’ असे शीर्षक असणाऱ्या या मालिकेने नाविन्यपूर्ण प्रकाराने हे स्थळ प्रेक्षकांच्या जवळ आणले आहे.

आपल्या छोट्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवत मनोरंजन करणारा आशय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणून व्हूट किड्स आपला समृद्ध आशय जागतिक दर्जाच्या अॅनिमेटेड क्षेत्रातील दिग्गजांबरोबर आणि आपल्या देशी सुपरहिरोसह सादर करते. एसटीबी आणि ग्रीन गोल्ड अॅनिमेशन यांच्याबरोबरच्या भागीदारीने भारतातल्या या लाडक्या कॅरेक्टरच्या आशयाला आणखी बळकटी येत आहे. 17 जुलै पासून सुरु होत असलेली ही लघु मालिका भारतभरातील मुलांचे इंग्लिश, हिंदी आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये मनोरंजन करणार आहे.

लाडक्या छोट्या भीमच्या 11व्या वाढदिवसानिमित्त वेब सीरीजही येणार आहे. या खास दिवस छोटा भीम आणि त्याची मित्रमंडळी सिंगापूरमध्ये साजरा करणार आहेत. प्रत्येक भागात प्रेक्षकांना या मंडळींनी केलेले साहस, धमाल इथपासून ते शॉपिंग आणि खाद्यपदार्थ आस्वाद अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घरबसल्या आरामात घेता येणार आहे.

सिंगापूरमधील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार!

यातील सात विशेष कथांमध्ये सिंगापूर मधल्या विविध ठिकाणांवर या पात्रांनी केलेल्या साहसी, धमाल गोष्टींनी ही सहल अविस्मरणीय बनते. छोटा भीम आणि त्याची मित्रमंडळी जेवेल चांगी विमानतळ आणि त्यांचे प्रसिद्ध एचएसबीसी रेन व्होर्टेक्स, सिंगापूर बोटॅनिक गार्डन, सिंगापूर प्राणिसंग्रहालय आणि नाईट सफारी अशा महत्वाच्या आकर्षण केंद्रांना भेट देणार आहेत. मरिना बे सँड्स इंटीग्रेटेड रिसोर्टनी चौकटीबद्ध केलेली शहराची प्रभावी, आकर्षक स्कायलाईनही या मालिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर बे जवळील उद्याने आणि सिंगापूर फ्लायरही या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. जोडीला भीम आणि मित्रमंडळी आईसलँड सिटीच्या रस्त्यांवरून तिथल्या दृश्य आणि ध्वनींचा अनुभव घेत. रेस्टॉरंट आणि तिथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाही दिसणार आहेत.

या आगळ्यावेगळ्या भागीदारीबद्दल बोलताना सिंगापूर टुरिझम बोर्डाच्या भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया विभागाचे प्रादेशिक संचालक गीबी श्रीथर म्हणाले, “आमच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे सध्याच्या तणावपूर्ण काळात भारतभरातल्या मुलांच्या आणि कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू आणणं आहे. छोटा भीम आणि त्याची मित्रमंडळी आनंद, आशा, विश्वास सोबत घेऊन येणारी भारतीय प्रेक्षकांची लाडकी, प्रेमाची पात्रं आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी ही ‘स्मितहास्याची भेट’ असलेली सात भागांची मालिका सादर करताना एसटीबीला खूप आनंद होत आहे. हे सगळे भाग संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करतील आणि घरातच सुरक्षित व्हर्च्युअली म्हणजेच आभासी पद्धतीने सिंगापूर फिरण्याचा अनुभव देतील अशी आम्हांला आशा आहे.”

छोट्यांचे घरबसल्या मनोरंजन

या सहकार्याबद्दल बोलताना व्हूट किड्सचे उपाध्यक्ष आणि आशय प्रमुख आशुतोष पारेख म्हणाले, “व्हूट किड्समध्ये आमचा मुख्य उद्देश हा मनोरंजन, शिकणं यांच्या भोवती फिरून पडद्यापुढे वेळ घालवताना अर्थपूर्ण आशय सादर करणे, मुलांच्या वयाला शोभेल असे मनोरंजन दाखवणे आणि 100% सुरक्षितता पाळणे हे आहे. त्यामुळेच आजवर कधीच न पाहिलेल्या सिंगापूर सफरीतल्या गोष्टी घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर न पडताही केवळ व्हूट किड्सवर बघता येणार आहेत.”

याबद्दल माहिती देताना ग्रीन गोल्ड अॅनिमेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चिलका म्हणाले, “माझा सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे जगभरात कोट्यावधी चाहते असलेल्या छोटा भीमला अॅनिमेटेड पात्र म्हणून सादर करणं. नवीन गोष्टी आणि नवी ठिकाणं नेहमीच भीमच्या साहसाला चालना देतात. छोटा भीम आणि मित्रमंडळी- अॅडव्हेन्चर्स इन सिंगापूर या लघु मालिका सादरीकरणाचे एकमेव स्थान असणाऱ्या व्हूट किड्सच्या साथीने या सगळ्या गोष्टी आणखी पुढच्या पातळीवर नेण्यासाठी मदत करणाऱ्या सिंगापूर टुरिझम बोर्ड बरोबर भागीदारी करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.”

(Chhota Bhim’s special virtual trip to Singapore for little friends)

हेही वाचा :

Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण…

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI