Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण…

बिग बॉस 14चा स्पर्धक-गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आता कायमचे एकमेकांचे झाले आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्यात उपस्थितीत दोघांचे लग्न झाले आहे.

Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण...
दिशा-राहुल

मुंबई : बिग बॉस 14चा स्पर्धक-गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आता कायमचे एकमेकांचे झाले आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्यात उपस्थितीत दोघांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर या दोघांचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत, जे आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसतोय.

लग्ना लागण्याआधी अर्थात वरमाला घालण्याच्या वेळी राहुलने दिशाच्या बोटात एक रिंग घातली. दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली. यादरम्यान राहुलने गोल्डन कलरची शेरवानी आणि दिशाने रेड कलरचा लेहंगा परिधान केला होता. लग्नानंतर दोघांनीही परिवाराकडून आशीर्वाद घेतला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.

पाहा काही खास फोटो आणि व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian Wedding (@indian__wedding)

राहुलचा जवळचा मित्र अभिनेता अली गोनीनेही राहुलच्या लग्नात हजेरी लावली होती. अली राहुलच्या लग्नाबद्दल खूप उत्साही होता.

चाहते दिशा आणि राहुलच्या लग्नाची फार दिवस प्रतीक्षा करत होते. बिग बॉस 14 दरम्यान राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले होते. दिशाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त बिग बॉसच्या घरी जाऊन राहुलच्या प्रस्तावाला प्रत्येकासमोर उत्तर दिले होते.

कशी झाली पहिली भेट?

राहुल आणि दिशा दोघांची भेट कॉमन मित्रांद्वारे झाली. या दोघांच्या नात्यात सोशल मीडियाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला त्याचे एक गाणे आवडले आणि मी त्याच्या पोस्ट लव्हची प्रतिक्रिया दिली ‘ त्याचवेळी राहुल म्हणाला होता की, ‘मला वाटलं की, ती इतकी सुंदर मुलगी आही, तर मी संधी कशी सोडू. मी दिशाला मेसेज केला आणि त्यानंतर आमचे संभाषण सुरू झाले आणि आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली.

हनिमूनची कोणतीही योजना नाही!

लग्नानंतर राहुल आणि दिशाची हनीमूनला कुठे जायचं याची अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. लग्नानंतर दोघांनाही मनसोक्त आराम करायचा आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहता त्यांनी कुठेही बाहेर जाण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली आहे.

(Special photos and videos of Rahul Vaidya and Disha Parmar Wedding)

हेही वाचा :

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

Love Affair | सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार ‘नगमा-सौरव’ लव्ह अँगल? चर्चांना उधाण…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI