Dishul Wedding | दिशाच्या हातावरची मेहंदी पाहून राहुल वैद्य म्हणतोय ‘मेहंदी लागा के रखना….’, पाहा व्हिडीओ

गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाच्या विधीला जोरदार सुरूवात झाली आहे. दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Dishul Wedding | दिशाच्या हातावरची मेहंदी पाहून राहुल वैद्य म्हणतोय ‘मेहंदी लागा के रखना....’, पाहा व्हिडीओ
दिशा परमार-राहुल वैद्य

मुंबई : गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाच्या विधीला जोरदार सुरूवात झाली आहे. दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता दुल्हेराजा राहुल आपल्या मेहंदी फंक्शनमध्ये आपल्या बायकोच्या प्रेमाची जादू अर्थात वधू दिशा परमारच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी गेला होता. या दरम्यान या गोड जोडीने केवळ मीडियासाठी फोटो पोजच दिल्या नाहीत, तर राहुलने दिशासाठी एक रोमँटिक गाणेही गायले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहु शकतो की, दिशाने दिशासाठी राहुलने ‘मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना’ हे गाणे गायले आहे. आपल्या भावी पतीची ही रोमँटिक स्टाईल पाहिल्यानंतर दिशा लाजताना दिसली आहे. त्यानंतर या दोघांनी सर्वांसमोर एकमेकांना मिठी मारली, हे आपण व्हिडीओमध्ये देखील पाहू शकतो. या दरम्यान, दिशाची गर्ल गँगही त्यांच्यासोबत दिसली.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पारंपारिक लूकमध्ये दिसली जोडी

गुलाबी रंगाची कुर्ती आणि फिकट हिरव्या रंगाच्या शारारामध्ये दिशा परमार खूपच सुंदर दिसत आहे. या पारंपरिक पोशाख सोबतच तिने चोकर हार आणि सुंदर इयररिंग्ज देखील परिधान केल्या आहेत. लग्नाआधीचा नववधूचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. दिशाचे दोन्ही हात आणि पाय मेहंदीमुळे सुंदर दिसत आहेत. राहुलचे कपडेही दिशेच्या आऊटफिटशी मिळते-जुळते आहेत. राहुलने हिरवा रेशीम कुर्ता पायजामा घातला आहे. या पारंपारिक लूकमध्ये तो खूप देखणा दिसत आहे.

सेलिब्रेटींची मांदियाळी

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य 16 जुलै रोजी मुंबईतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नात राहुल आणि दिशाचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांच्या यादीमध्ये मिका सिंग, अली गोनी आणि जास्मीन भसीन यांची नावे सामील आहेत. दिशा आणि राहुलचे लग्न हे यावर्षीचे सर्वात चर्चित लग्न आहे.

(Disha Parmar and Rahul Vaidya wedding started rahul sing song for disha’s mehendi)

हेही वाचा :

Net Worth | बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत, जाणून घ्या अभिनेत्रीची संपत्ती किती?

Khoya Khoya Chand | ‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI