Net Worth | बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत, जाणून घ्या अभिनेत्रीची संपत्ती किती?

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. त्याच्या अभिनयाचे लाखो लोक दिवाने आहेत. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती जगभरात ओळखली जाते. कंगना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

Net Worth | बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत, जाणून घ्या अभिनेत्रीची संपत्ती किती?
कंगना रनौत

मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. त्याच्या अभिनयाचे लाखो लोक दिवाने आहेत. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती जगभरात ओळखली जाते. कंगना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिचे चाहते तिला इंडस्ट्रीची ‘लेडी रॉकस्टार’ मानतात. कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कंगनाने आपले हे स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. बर्‍याच दिवसांच्या मेहनतीनंतर कंगना या टप्प्यावर पोहोचली आहे.

अभिनय, मॉडेलिंग आणि चित्रपट निर्मितीत कठोर परिश्रमानंतर कंगना आता लक्झरी आयुष्य जगते आहे. बरेच लोक तिच्या या प्रवासातून प्रेरणा घेतात. संघर्षाच्या वेळी कंगनाने कधीच हार मानली नाहीम्हणूनच आता ती या टप्प्यावर आली आहे. कंगना आता कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण आहे.

कॅकनॉज डॉट कॉमच्या वृत्तानुसार कंगना रनौत ही सुमारे 94 कोटींच्या मालमत्तेची मालक आहे. तिचे बहुतांश उत्पन्न ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेस आणि चित्रपटांमधून अभिनय यामुळे होते. मध्यम अहवालांनुसार कंगनाला एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये मिळतात. एका ब्रँडला अ‍ॅन्डॉर्स देण्यासाठी ती 3 ते 3.5 कोटी रुपये घेते.

कंगना रनौतचे घर

कंगना सध्या मुंबईत राहते. मात्र, तिने मनालीमध्ये जमीन खरेदी करून बंगला बांधला आहे. या मालमत्तेचे मूल्य सुमारे 30 कोटी रुपये आहे. या बंगल्यामध्ये तिने एक सेंद्रिय शेती, तबेले व कॉटेज तयार केले आहेत. कारण, तेथे बर्फवृष्टी देखील होते.

कंगनाने 2017मध्ये पाली हिल्समध्ये तीन मजली इमारत खरेदी केली होती. मध्यम अहवालानुसार तिने 20 कोटींमध्ये ही इमारत खरेदी केली होती. या इमारतील तिने आपले कार्यालय बनवले आहे. ज्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स आहे. हे ऑफिस तयार करण्यासाठी कंगनाने सुमारे 48 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कंगनाने मनालीतील बंगला 10 कोटीमध्ये विकत घेतला आहे. यात 8 बेडरूम आहेत. ते तयार करण्यासाठी कंगनाने 20 कोटींची गुंतवणूक केली होती. हा बंगला तिने 2018 मध्ये खरेदी केला होता.

कंगनाचे कार कलेक्शन

कंगना रनौतने वयाच्या 21व्या वर्षी तिची पहिली कार बीएमडब्ल्यू 7 सीरीज खरेदी केली. याशिवाय ती एका मर्सिडीज बेंझ जीएलई-क्लास एसयूव्हीची मालकीण आहे. मनालीतील घरासाठी कंगनाने ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत 73.7 लाख ते 1.25 कोटीपर्यंत आहे.

(Bollywood Queen Actress Kangana Ranaut Net worth)

हेही वाचा :

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!

Leander Paes Kim Sharma Affair | टेनिस स्टार लिएंडर पेसला डेट करतेय किम शर्मा, गोवा ट्रिपचे फोटो चर्चेत!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI