AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Affair | सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार ‘नगमा-सौरव’ लव्ह अँगल? चर्चांना उधाण…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) बायोपिक बनणार असल्याचे जाहीर केले गेले, तेव्हा त्याच्याशी संबंधित वाद पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला.

Love Affair | सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार ‘नगमा-सौरव’ लव्ह अँगल? चर्चांना उधाण...
नगमा-सौरव
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 12:43 PM
Share

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडमधील संबंध नवीन नाही. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पटौदीपासून  ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या प्रेमकथा चर्चेत राहिल्या आहेत. दरम्यान, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) बायोपिक बनणार असल्याचे जाहीर केले गेले, तेव्हा त्याच्याशी संबंधित वाद पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला. आपण सौरव गांगुलीच्या ज्या वादाबद्दल बोलणार आहोत, त्याचा केवळ माजी क्रिकेटपटूच्या कारकिर्दीवर परिणाम झाला नाही, तर यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही गडबड झाली. हो, आपण सौरव गांगुली आणि बॉलिवूड अभिनेत्री नगमा यांच्या प्रेमसंबंधातील वादाबद्दल बोलत आहोत.

जरी सौरव गांगुलीने नागमाशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही. पण आता जेव्हा त्याचा बायोपिक जाहीर झाला, तेव्हा लोकांचा असा अंदाज आहे की, नगमाबरोबरचे त्याचे संबंधही या चित्रपटाच्या कथेत दिसणार आहेत. तथापि, हे असे घडेलच की नाही, हे चित्रपटाच्या रिलीजनंतरच कळेल.

नगमा आणि सौरव गांगुलीची पहिली भेट कधी झाली?

फिल्म बीटच्या एका वृत्तानुसार, सौरव गांगुलीचे बॉलिवूड कनेक्शनही आहे. सौरव गांगुली अभिनेत्री नगमाच्या प्रेमात पडला होता. 1999च्या वर्ल्ड कप दरम्यान नगमा आणि सौरव गांगुली यांची भेट झाली. मात्र, सौरव गांगुलीचा जेव्हा नागमावर जीव जडला, त्यावेळी त्याचे लग्न झाले होते. नगमाला भेटण्याअगोदर दोन वर्षांपूर्वी त्याने डोनाशी लग्न केले होते. नगमा आणि सौरव गांगुलीचे हे नाते माध्यमांच्या मथळ्यांमध्ये इतके होते की, क्रिकेटपटूच्या लग्नालादेखील धोका निर्माण झाला होता. डोनाने सौरव गांगुलीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या माजी क्रिकेटपटूने अत्यंत हुशारीने नगमापासून अंतर ठेवले.

सौरव गांगुलीने कधीही आपल्या अफेअरबद्दल वक्तव्य केले नसले, तरी नगमाने एकदा सेवी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत स्वत: आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यांच्यातील संबंधांबद्दल मौन सोडले. यासोबतच नगमाने असा दावाही केला होता की, तिने आपले नाते कधीही नाकारले नाही.

का झाला ब्रेकअप?

झूममधील एका वृत्तानुसार, नागमा यांनी सेव्ही मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, कोणीही काही बोलले नाही, कोणीही काही नाकारले नाही. यादरम्यान नागमाने तिच्या ब्रेकअपबद्दलही सांगितले. अभिनेत्री म्हणाली होती की, इतर गोष्टींबरोबरच तिचे करिअरदेखील धोक्यात आले होते, म्हणून एकाला मागे व्हावे लागले. अहवालानुसार, या नात्यामुळे गांगुलीच्या खराब कामगिरीसाठी तिला दोषी ठरवण्यात आले होते, असा दावाही नगमा यांनी केला होता.

आता नगमा आणि सौरव गांगुली आपापल्या जीवनात आनंदी आहेत. गेल्या वर्षी नागमाने सौरव गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यावरून असे दिसून येते की या दोघांमध्ये आता कोणताही दुजाभाव नाही.

(Nagma Sourav love angle to appear in Sourav Gangulys biopic)

हेही वाचा :

Happy Birthday Katrina Kaif | सलमान खान ते अक्षय कुमार प्रत्येक अभिनेत्यासोबत सुपरहिट ठरली कतरिनाची जोडी!

Zindagi Na Milegi Dobara  | ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ची दमदार 10 वर्ष, कलाकारांनी शेअर केल्या खास आठवणी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.