Kaali Peeli Tales : मुंबई शहरातील प्रेम, नाती आणि जीवनाचा विस्तृत पट रंगवणारी कथामालिका ‘काली पीली टेल्स’!

‘काली पीली टेल्स’मधून मुंबई शहरातील प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाच्या जटिलतेला उत्तम प्रकारे दर्शवण्यात आलं आहे. (Kaali Peeli Tales: A series of stories depicting love, relationships and life in Mumbai)

Kaali Peeli Tales : मुंबई शहरातील प्रेम, नाती आणि जीवनाचा विस्तृत पट रंगवणारी कथामालिका ‘काली पीली टेल्स’!


मुंबई : अ‍ॅमेझॉनची (Amazon) मोफत व्हिडीओ मनोरंजन सेवा– मिनी टीवीनं (Amazon miniTV) एका आकर्षक ट्रेलरच्या अनावरणासोबत आपली पहिली सीरीज, काली पीली टेल्सच्या (Kaali Peeli Tales) प्रीमियरची घोषणा केली असून 20 ऑगस्ट, 2021 ला ही प्रदर्शित होणार आहे.  दिग्गज कलाकारांच्या अभिनयानं नटलेल्या ‘काली पीली टेल्स’ मध्ये मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर सहा छोट्या छोट्या कथांना अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडण्यात येणार आहे.

‘काली पीली टेल्स’मधून मुंबई शहरातील प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाच्या जटिलतेला उत्तम प्रकारे दर्शवण्यात आलं आहे. यातील सहा अनोख्या कहाण्यांचे कथानक परिवर्तन आणि स्वीकृतिच्या सीमारेषेवर उभे असणाऱ्या तरुणांच्या आणि इथल्या शहरी व्यक्तिरेखांच्या आस पास फिरणारे आहे, यामध्ये विनय पाठक, गौहर खान, सयानी गुप्ता, मानवी गगरू, सोनी राजदान, हुसैन दलाल, शारिब हाशमी, प्रियांक्षी पेन्युली, तन्मय धनानिया, सादिया सिद्दीकी आणि अदीब रईस यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

पाहा ट्रेलर

यातील प्रत्येक कथा प्रणय, विवाह, समलैंगिकता, माफी आणि घटस्फोट या विषयांवर केंद्रित असून महानगरीय जीवनातील आणि सध्याच्या डिजिटल युगातील अनिश्चिततेला लक्षात घेऊन, आपापसातील नातेसंबंधांना पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून सादर करते. काली पीली टॅक्सी ही मुंबईची ओळख आहे आणि कथामालिकेतील कथांना जोडणारा दुआदेखील आहे. सिंगल झुमका, लव्ह इन ताडोबा, मॅरेज 2.0, फिश फ्राय और कॉफी, हरा भरा आणि लूज एंड्स ही या कथांची शीर्षकं आहेत.

काली पीली टेल्सचे दिग्दर्शक अदीब रईस हे म्हणाले कि, “या कथासंग्रहातील सर्व सहा कथा प्रेमाच्या आणि नात्यांच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. नवीन प्रेमापासून ते विवाहित जीवनाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत, प्रेमातील धोका इथपासून घटस्फोटापर्यंत, त्याची प्रत्येक कथा प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांनी भरलेल्या मजेदार प्रवासात घेऊन जाईल. नामांकित कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसह, मुंबई शहर या प्रत्येक कथेमध्ये एक मनोरंजक आयाम जोडणारे ठरते.”

संबंधित बातम्या

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर दर्शन, नकारात्मकतेबद्दल दिला ‘हा’ संदेश!

इंडियन आयडॉल जिंकणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून किती पैसा मिळतो? जाणून घ्या…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI