राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर दर्शन, नकारात्मकतेबद्दल दिला ‘हा’ संदेश!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 16, 2021 | 12:24 PM

गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पा सर्व बाजूंनी पूर्णपणे गायब झाली होती. पण पतीच्या अटकेनंतर अलीकडेच अभिनेत्रीने पहिल्यांदा चाहत्यांना स्वतःची एक झलक दाखवली आणि सर्वांसमोर सोशल मीडियावर आली. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर दर्शन, नकारात्मकतेबद्दल दिला ‘हा’ संदेश!
Shilpa shetty

मुंबई : पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेपासून, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर आहे. शिल्पाला डान्सिंग रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये जज म्हणून पाहिले गेले होते, पण आता अभिनेत्रीने तेही शूटिंग थांबवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पा सर्व बाजूंनी पूर्णपणे गायब झाली होती. पण पतीच्या अटकेनंतर अलीकडेच अभिनेत्रीने पहिल्यांदा चाहत्यांना स्वतःची एक झलक दाखवली आणि सर्वांसमोर सोशल मीडियावर आली. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती नकारात्मकता दूर करण्यासाठी योगा करताना दिसली आहे आणि लोकांना देखील योगा करण्याचा सल्ला देत आहे.

खरं तर, शिल्पा कोरोना मदत निधी गोळा करणाऱ्या ‘V of India’ या संस्थेशी संबंधित आहे. या संदर्भात, 15 ऑगस्ट रोजी शिल्पा पहिल्यांदा सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि तिने योगाचे महत्त्व सांगितले. याची एक छोटीशी क्लिप अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे, ज्यात शिल्पा म्हणत आहे की, ‘सकारात्मक राहण्यासाठी, श्वासोच्छ्वास सुधारण्यासाठी आजच्या काळात प्राणायाम पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे’. त्याचवेळी, हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, शिल्पाने व्हिडीओमध्ये म्हटले होते की, ‘कठीण काळात वाईट विचार येणे स्वाभाविक आहे, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायमचे परिमाण खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, सकारात्मक राहण्यासाठी, आपला श्वास योग्य करण्यासाठी, आजच्या काळात प्राणायाम पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचा झाला आहे.’

सोशल मीडियावर ट्रोल

राजच्या अटकेनंतर शिल्पाला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. अभिनेत्रीने स्वत:ला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर केले असले, तरी 15 ऑगस्टच्या निमित्ताने तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून देशवासियांचे अभिनंदन केले आणि नंतर ती पुन्हा ट्रोल झाली.

पाहा पोस्ट :

पोस्ट शेअर करत शिल्पाने लिहिले की, “जगभरातील माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”. शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर, लोकांनी तिचे स्वातंत्र्यदिनी अभिनंदन केले, तर काही असे आहेत ज्यांनी तिला ट्रोल करणे या दिवशीही टाळले नाही. त्याच्या पोस्टवर एका वापरकर्त्याने राज कुंद्रा प्रकरणावर लिहिले,  तर दुसऱ्या ट्रोलरने विचारले की, राज कुंद्रा जेलमधून कधी येत आहे?

हेही वाचा :

सैफ अली खान- ‘हम तुम’ ते ‘तान्हाजी’… आगळ्यावेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता!

पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी, पाहा 12 तासांच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI