AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Diaries 26/11 | ‘मुंबई डायरीज 26/11’ फेम मोहित रैना रमला आपल्या डॉक्टर वडिलांच्या आठवणीत!

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची आगामी ओरिजिनल सीरीज ‘मुंबई डायरीज़ 26/11’ (Mumbai Diaries 26/11) दर्शकांसाठी बहुप्रतीक्षित सीरीज आहे, याचे एक खास कारण आहे, सीरीजमध्ये दिसणारी स्टारकास्ट ज्यांनी 26/11च्या आतंकवादी हल्ल्याची एक वेगळी बाजू दाखवली आहे.

Mumbai Diaries 26/11 | ‘मुंबई डायरीज 26/11’ फेम मोहित रैना रमला आपल्या डॉक्टर वडिलांच्या आठवणीत!
मोहित रैना
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 08, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची आगामी ओरिजिनल सीरीज ‘मुंबई डायरीज़ 26/11’ (Mumbai Diaries 26/11) दर्शकांसाठी बहुप्रतीक्षित सीरीज आहे, याचे एक खास कारण आहे, सीरीजमध्ये दिसणारी स्टारकास्ट ज्यांनी 26/11च्या आतंकवादी हल्ल्याची एक वेगळी बाजू दाखवली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने दर्शकांना या काल्पनिक, मेडिकल ड्रामा सीरीजने प्रेक्षकांना याची वाट पाहण्यास आतुर केले आहे.

डॉक्टरांचा मुलगा असल्याने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत मोहित रैना (Mohit Raina) म्हणाला, ‘एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान ठरलो आहे, कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी येत असत, तरी प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायचे आणि त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे. दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना तपासायला आणि त्यांना मदत करायाला नेहमीच सज्ज असत.’

वडिलांकडून मिळाली प्रेरणा

‘ते जेव्हा परत येत, तेव्हा मला त्यांच्या हावभावावरून समजत असे की, ते रुग्णाला वाचवू शकले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्याला मदत करू शकले आहेत. आणि म्हणून मला वाटते की मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो आणि त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो, हे माझे सद्भाग्य आहे आणि कदाचित हेच या सीरीजमध्ये देखील उमटले आहे, ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आहे’, असे अभिनेता मोहित रैना म्हणाला.

फ्रंटलाईन कामगारांना मानवंदना

फ्रंटलाईन कामगारांसाठी एक अनोखी आणि काव्यात्मक श्रद्धांजली म्हणून, मोहित रैनाने (Mohit Raina) एक विशेष अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ही कविता राकेश तिवारी यांनी लिहिली आहे, जी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची आगामी सीरीज मुंबई डायरीज 26/11च्या प्रीमियरपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोहित रैना यांनी राकेश तिवारींनी लिहिलेली कविता वाचून फ्रंटलाईन कामगारांना श्रद्धांजली वाहली आहे.

‘साहस को सलाम’, ही कविता वैद्यकीय प्रजननक्षमतेचे आभार मानून त्यांना प्रत्येक गरजेत मदत करण्यासाठी आणि प्रत्येक वैयक्तिक आव्हानाचा सामना करताना त्यांच्या कर्तव्याची भावना कशी बळकट करते याबद्दल आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रेक्षकांना फ्रंटलाईन कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. व्हिडीओ एका नोटवर संपतो, दर्शकांना www.mumbaidiary.in वर घेऊन जातो जिथे ते आपल्या शूर फ्रंटलाईन हिरोजसाठी त्यांचा संदेश शेअर करू शकतात.

पडद्यावर दिसणार 26/11ची दुसरी बाजू

निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत. ‘मुंबई डायरीज 26/11’ चे प्रीमियर जागतिक स्तरावर अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 9 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.

हेही वाचा :

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या बहुप्रतीक्षित पोस्टरचे अनावरण, सलमान खानच्या विरुद्ध दिसणार आयुष शर्मा!

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?