AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्याच्या प्रेमात होते, पण मग नंतर…; कोकण हार्टेड गर्ल अंकिताकडून ती घटना शेअर

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Lovestory : हार्टेड गर्ल अंकिता वालावालकर 'त्या' घटनेवर व्यक्त; म्हणाली, मी त्याच्या प्रेमात होते, पण मग नंतर... अंकिता वालावालकर त्या व्हीडिओमध्ये नेमकं काय म्हणाली? तो प्रसंग नेमका काय? वाचा सविस्तर.....

मी त्याच्या प्रेमात होते, पण मग नंतर...; कोकण हार्टेड गर्ल अंकिताकडून ती घटना शेअर
| Updated on: Mar 18, 2024 | 3:48 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स सध्या प्रचंड चर्चेत असतात. त्यांच्या फोटो आणि व्हीडिओंमुळे ते सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. स्मार्टफोन वापरणारे जवळपास सगळेच लोक रील्स बघत असतात. सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी इन्फ्लुएंसर म्हणजे हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावालकर… अंकिताचे रील्स तिचा सोशल मीडियावरवरील प्रेजेन्स नेटकऱ्यांना आवडतो. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होण्याआधी अंकिताचं पर्सनल लाईफमध्ये फार चढ-उतार आले. हे सगळे अनुभव अंकिताने व्हीडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर शेअर केलेत.

“मी त्याच्या प्रचंड प्रेमात होते”

कॉलेजमध्ये असतानाची घटना अंकिताने शेअर केली आहे. मी त्याच्या प्रचंड प्रेमात होते. त्याच्यासोबत राहायला मला आवडत होतं. एके दिवशी मी ठरवलं की त्याच्याच सोबत राहिलं पाहिजे. मी त्याला म्हटलं आपण लग्न करूया. पण मग मला कळालं की आई मला शोधते आहे. म्हणून मग मी घरच्यांना काहीही न सांगता त्याच्या घरी राहायला गेले. तिथं मी बराच काळ राहिले. त्याच्या घरच्यांच्या सोबत मी त्याच्यासोबत राहत होते. दीड वर्ष मी त्याच्या घरी राहिले.

अंकिताचं लग्न झालंय?

अंकिता प्रभू वालावालकर हिने तिच्या लग्नाबाबत पसरणाऱ्या अफवेवर भाष्य केलं. मी त्याच्या घरी राहात होते. लोकांना वाटलं की त्याचं आणि माझं लग्न झालं आहे. पण तसं काहीही नव्हतं. मी त्याच्या घरी राहात होते. मात्र आमचं लग्न झालेलं नव्हतं, असं अंकिताने तिच्या यूट्यूबवरच्या व्हीडिओत सांगितलं. दीड वर्ष मी त्याच्या घरात राहत होते. तो काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. तो मला मारायचा. मला शिव्या द्यायचा. त्या सगळ्याचा अतिरेक झाला आणि मी ते घर सोडलं, असं अंकिता म्हणाली.

आजही मी त्यांना भेटते- अंकिता

तो माझ्या पेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. त्यामुळे आमच्यात बरेच वाद व्हायचे. पण त्याच्या आईशी माझं फार पटायचं. आजही मी त्याच्या आईला भेटायला जाते. मी काही नवीन गोष्ट केली तर त्यांना सांगते. त्या माझ्यासाठी माझ्या आई सारख्याच आहेत, असं अंकिताने या व्हीडिओमध्ये सांगितलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.