AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकले आमुचे काही… कुशल बद्रिके भावूक; ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील व्हीडिओ शेअर

Kushal Badrike Post About Chala Hawa Yeu Dya Last Episode : 'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा भाग प्रसारित झाल्यानंतर कलाकार भावूक; कुशल बद्रिकेकडून पोस्ट शेअर, चला हवा येऊ द्याच्या सेटवरील व्हीडिओत कुशल नेमकं काय म्हणाला? कुशलने शेअर केलेला व्हीडिओ पाहा...

चुकले आमुचे काही... कुशल बद्रिके भावूक; 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील व्हीडिओ शेअर
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 18, 2024 | 2:46 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. काल या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यामुळे प्रेक्षकांसोबतच या कार्यक्रमातील कलाकारांही भावनिक झाले आहेत. अभिनेता कुशल बद्रिके याने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरचा एक व्हीडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानलेत. तसंच काही चुकलं असल्यास माफ करावं असंही कुशलने म्हटलं आहे. कुशलचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.

कुशलच्या व्हीडिओत नेमकं काय?

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी. चुकले आमुचे काही आम्हा क्षमा असावी…, असं कुशलने या व्हीडिओत म्हटलं आहे. माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. “चूक भूल द्यावी घ्यावी” असं म्हणत कुशलने चला हवा येऊ द्याच्या सेटवरचा व्हीडिओ शेअर केलाय. त्याचा हा व्हीडिओ पाहून प्रेक्षकही भावूक झाले आहेत. त्यांनी कुशलच्या व्हीडिओवर कमेंट केल्या आहेत.

प्रेक्षकांच्या कमेंट्स

बघता बघता कधी १० वर्ष झाली कळलं सुद्धा नाही… स्वतःचा दुःख बाजूला ठेवून, आम्हा प्रेक्षकांना तुम्ही सतत हसवलात… त्यासाठी मनःपूर्वक आभार… आता सांगायचं झालं तर, आपल्या घरातून कोणी बाहेर गेला , की कसा आपण त्याची वाट पाहत असतो… त्याच आश्याने आम्ही तुमच्या सर्वांची वाट पाहू…, असं एका प्रेक्षकाने कमेंट केली आहे. गेल्या 10 वर्षा मधे आम्हाला आमची दुःख विसरून चेहऱ्यावर हसू आणल्याबद्दल धन्यवाद… यापुढे पण असंच तुम्ही आम्हाला हसवत राहणार ही गॅरंटी आहे. धन्यवाद… आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा…, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

संतोष जुवेकरची विशेष कमेंट

अभिनेता संतोष जुवेकर यानेही कुशलच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. पुराना जायेगा तभीतो नया आयेगा. Love u all आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत, असं संतोषने म्हटलं आहे.

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल