AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच रिलीज होणार; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर? वाचा…

Purush Web Series Relese on Planet Marathi : एक नवी कोरी वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठीवर 'पुरुष' वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ही वेबसिरिज आहे. या वेबसिरीजची कथा काय आहे? वाचा सविस्तर...

'पुरुष' वेबसिरीज लवकरच रिलीज होणार; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर? वाचा...
| Updated on: May 25, 2024 | 8:01 PM
Share

सध्या ओटीटीवर दर्जेदार कथा असणाऱ्या वेबसिरिज पाहायला मिळत आहे. जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच धमाकेदार विषय प्रेक्षकांकरिता घेऊन येतचं असतो .’रानबाजार’च्या जागतिक यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘पुरुष’ ही नवीन वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. नुकतंच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आलीय. या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

वेबसिरिजमध्ये कोण- कोण कलाकार?

‘पुरुष’ ही वेबसिरीज जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित आहे. समाजरचनेतील पुरुषी अहंकार आणि त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. तसंच वास्तविक जीवनावर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत आणि अभिजित पानसे, श्रीरंग गोडबोले, प्रसन्न आजरेकर यांनी निर्मिती केली आहे. सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

पुरुष ही वेबसिरीज पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करतात. स्त्रियांना माणूस म्हणून नाही तर लैंगिक वस्तू म्हणून पाहिलं जातं. याबद्दल स्त्रियांची प्रतिक्रिया या वेबसिरीजमध्ये पाहण्यासारखी आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रत्येक स्त्री पुरुषाने बघायला हवी, असं अभिजित पानसे यांनी पुरुष वेबसिरिजबद्दल म्हटलं आहे.

अक्षय बर्दापूरकर काय म्हणाले?

अभिजित पानसे आणि प्लॅनेट मराठीच घट्ट नातं आहे. त्यांनी केलेली ‘रानबाजार’ वेबसिरीजला भरघोस यश मिळाल्यानंतर आता ‘पुरुष’ वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर घेऊन येत आहोत. रानबाजार बघितल्यावर त्या वेबसिरीजचं कौतुक श्री. शाम बेनेगल, श्री. अमोल पालेकर, श्री. एन. चंद्रा यासारख्या दिग्गज व्यक्तींनी देखील केलं आहे, असं प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटलं आहे.

अभिजित पानसे हे केवळ मराठीतीलच नव्हे तर देशातील एका उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते कायम वेगळे प्रयोग करत असतात. पुरूष ही वेबसिरीज अशा प्रकारे तुम्हाला पहायला मिळेल की असा प्रयोग जगात पहिल्यांदाच समोर येईल. त्यामुळे या वेबसिरीजला भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही, असंही अक्षय बर्दापूरकर म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.