Bigg Boss OTT : शमिता शेट्टी राकेशला म्हणाली – इथे ये आणि आता मला किस कर, पाहा पुढे काय झालं…

आता शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात शमिता शेट्टी राकेश बापटला तिच्या गालावर किस करण्यास सांगते. (Shamita Shetty said to Rakesh - Come here and kiss me now, see what happened next ...)

Bigg Boss OTT : शमिता शेट्टी राकेशला म्हणाली - इथे ये आणि आता मला किस कर, पाहा पुढे काय झालं...

मुंबई : शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Rakesh Bapat) यांची गोड केमिस्ट्री बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) लोकांची मनं जिंकत आहे. प्रत्येक भागातील त्यांची केमिस्ट्री हे सर्वांचं आकर्षण ठरते. दोघांमधील संबंध अधिक घट्ट होत आहे. राकेश शमितासोबतच्या कनेक्शनची खूप काळजी घेताना दिसतोय. त्यामुळे वाढत्या मैत्रीची दखल संपूर्ण बीबी हाऊस घेत आहे.

आता शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात शमिता शेट्टी राकेश बापटला तिच्या गालावर किस करण्यास सांगते. तिची ही मागणी पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. शिवाय राकेश सांगतो की तो यासाठी नेहमी तयार असतो. प्रोमो व्हिडीओमध्ये शमिता जेवण करत असते. त्याच वेळी, राकेश मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी येतो. मग शमिता म्हणते – ते पूर्ण गरम करू नको. अन्यथा ते घट्ट होईल. पुढे राकेश म्हणतो – आणखी काही. राकेश कडून हे ऐकून शमिता शेट्टी काही सेकंद त्याच्याकडे टक लावून बघत म्हणाली तुला काही अडचण आहे का? मग मी ते करणार नाही. मग राकेश म्हणतो की त्याला काही अडचण नाही. तो फक्त विचारत होता की तुला आणखी काही सांगायचं आहे का? यानंतर, हसत हसत शमिता शेट्टी म्हणते- इथं ये आणि मला आत्ताच एक किस कर. राकेश लगेच शमिताला किस करतो.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

राकेश आणि शमिता शोमध्ये अनेकदा एकमेकांशी फ्लर्ट करताना दिसले. एका एपिसोडमध्ये तर राकेश शमिताच्या बेडवर जातो आणि तिला विचारतो की तो तिथे झोपू शकतो का? राकेश आणि शमिता भावनिक क्षणही शेअर करतात.  याआधी, जेव्हा राकेश दिव्या अग्रवालशी बोलला तेव्हा शमिता शेट्टी खूप चिडली होती. मात्र राकेशचे गोड प्रयत्न पाहून शमिता सहमत झाली.

राकेश आणि शमिताला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी आहेत. राकेश शमिताला किस करत तिचे पाय दाबतानाही दिसत आहे. दोघंही त्यांचा बहुतेक वेळ घरी एकत्र घालवतात.

संबंधित बातम्या

Sushant Video : ‘एमएस धोनी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान कॅप्टन कूलला त्रास द्यायचा सुशांत, पाहा व्हिडीओ

Ananya Panday : अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर

Shah Rukh Bodyguard : डॉक्टर-इंजीनिअरपेक्षाही शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंहचा पगार बक्कळ, रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI