This Week OTT Release | ‘कोटा फॅक्टरी 2’ ते ‘बर्ड्स ऑफ पॅराडाईज’, या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी!

| Updated on: Sep 22, 2021 | 7:51 AM

ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. वेब सीरीज असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट असो, लोकांमध्ये त्याबद्दल खूप क्रेझ आहे. याआधी बहुतेक वेब सीरीज ओटीटीवर पाहिल्या गेल्या होत्या.

This Week OTT Release | ‘कोटा फॅक्टरी 2’ ते ‘बर्ड्स ऑफ पॅराडाईज’, या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी!
OTT Release
Follow us on

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. वेब सीरीज असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट असो, लोकांमध्ये त्याबद्दल खूप क्रेझ आहे. याआधी बहुतेक वेब सीरीज ओटीटीवर पाहिल्या गेल्या होत्या, पण कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. 50 टक्के चित्रपटगृहे उघडल्यानंतरही निर्माते त्यांच्या चित्रपटांशी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.

कोरोना युगानंतर, ओटीटीचे माध्यम लोकांसाठी मनोरंजनाचे प्रमुख साधन बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, हॉटस्टारसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. या आठवड्यात देखील OTT प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

कोटा फॅक्टरी 2

प्रत्येकजण ‘कोटा फॅक्टरी 2’ची आतुरतेने वाट पाहत आहे. देशभरातील आयआयटी, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण केंद्र असलेल्या कोटावर ही सीरीज आधारित आहे. या मालिकेच्या कथेमध्ये इटारसी कोटा येथील 16 वर्षीय वैभवच्या जीवनाची कथा आहे. या सीरीजमध्ये संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संघर्षाची मालिका सुंदरपणे दाखवली आहे. ही मालिका 24 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, अहसास चन्ना आणि मयूर मोरे मुख्य भूमिकेत आहेत.

मिडनाइट मास

मिडनाइट मासची कथा एका लहान आइसलँड समुदायावर आधारित आहे. हे सुरू होते जेव्हा रिले नावाचा एक बदनाम तरुण पुजारी म्हणून शहरात परततो आणि त्याच्या आगमनानंतर काही चमत्कारिक गोष्टी घडतात. या मालिकेत केट सिगेल, जॅच गिलफोर्ड, हॅमिश लिंकलेटर यांच्या भूमिका आहेत. ही वेब सीरीज 24 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.

बर्ड्स ऑफ पॅराडाईज

‘बर्ड्स ऑफ पॅराडाईज’ हा एक अमेरिकन चित्रपट आहे जो 2019ची कादंबरी ‘ब्राईट बर्निंग स्टार्स’वर आधारित आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर रोजी Amazon प्राइमवर रिलीज होत आहे आणि यात क्रिस्टीन फ्रोसेथ, डायना सिल्व्हर्स, जॅकलिन बिसेट मुख्य भूमिकेत आहेत. तर, हा चित्रपट सारा अदिना स्मिथने दिग्दर्शित केला आहे.

प्रॉमिसिंग यंग वुमन

या चित्रपटाची कथा केरी मुलिगनच्या जीवनाभोवती फिरते. जो एक त्रासदायक भूतकाळाने पछाडलेली तरुणी आहे. ती नेहमी सूड आणि क्षमा यात समतोल राखते. हा चित्रपट एचबीओ मॅक्सवर रिलीज होईल आणि कॅरी मुलिगन, बो बर्नहॅम, एलिसन ब्री, क्लॅन्सी ब्राउन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

क्राइम स्टोरीज: इंडिया डिटेक्टिव्ह

1 गुन्हाच्या चार मनोरंजक कथांचे संपूर्ण सत्य आता लोकांसमोर येईल. क्राइम स्टोरीज इंडिया डिटेक्टिव्ह ही एक सीरीज आहे, जी चार भागांमध्ये बनलेली आहे. ज्यात पोलिसांसह बंगळुरूचे चार गुप्तहेर अत्यंत धक्कादायक अशा या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही सीरीज 22 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

Ishwari Deshpande | चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर, तर साखरपुडा अवघ्या एक महिन्यावर, आनंद अनुभवण्यापूर्वीच ईश्वरी देशपांडेने घेतला जगाचा निरोप!

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश