पाकिस्तानची तर मोठी लॉटरीच लागली, उपासमारी मिटणार आणि कर्जही फिटणार, पाहा काय घडले ?
Pakistan Black Gold Discovery: पाकिस्तानला एका महिन्यात तिसऱ्यांदा मोठा खजाना सापडला आहे. त्यामुळे भुकेकंगाल असलेल्या पाकिस्तानचे नशीब पालटणार आहे.या काळ्यासोन्याच्या मदतीने पाकिस्तानची गरीबी मिटू शकते आणि कर्जही फीटू शकते असे म्हटले जात आहे.

आपला शेजारील पाकिस्तानला पुन्हा लॉटरी लागली आहे. पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनी ऑईल एण्ड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने (OGDCL) खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या कोहाट जिल्ह्यात तेल आणि गॅसच्या नव्या साठ्याचा शोध लागल्याची घोषणा केली आहेच. हा शोध Baragzai X-01 (Slant) नावाच्या एक्सप्लोरेटरी विहीरीतून झाली आहे. हा एका महिन्यातील तिसरा शोध आहे. त्यामुळे पाकिस्तानला घरगुती तेल उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
हजारो बॅरल कच्चे तेलाच्या उत्पादन
या विहिरीला ३० डिसेंबर २०२४ रोजी खोदले होते. त्यानंतर समाना सुक आणि शिनाव्हरी फॉर्मेशनने केस्ड होल ड्रिल सिस्टीमने चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या निष्कर्षानुसार रोज ३१०० बॅरल कच्चे तेल आणि ८.१५ मिलियन स्टँडर्ड क्युबिक फीट नैसर्गिक गॅसचे उत्पादन होण्याची आकडेवारी समोर आली आहे.या ३२/64 इंच चोक साईजवर ३०१० पाऊंड प्रति चौरस इंचाच्या वेलहेड फ्लोईंग प्रेशरसह उत्पादन होणार आहे.
तेल आणि गॅसच्या उत्पादन पाकिस्तानची चांदी
गेल्या एक महिन्यातील हा तिसरा साठा सापडला आहे. या तिन्ही साठ्यांमुळे पाकिस्तानच्या घरगुती तेल उत्पादनात सुमारे ९४८० बॅरल प्रतिदिन वाढ होणार आहे. या देशाचे सध्याचे उत्पादन (सुमारे ६६,००० बॅरल प्रतिदिन ) सुमारे १४.५ टक्के आहे. या शिवाय गॅस उत्पादनात देखील चांगली वाढ झाली आहेत. OGDCL ने ही माहिती पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंजला नोटीस देऊन दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये OGDCL चे ६५ टक्के शेअर आहेत.तर पाकिस्तानी पेट्रोलियम लिमिटेडचे(PPL) ३० टक्के आणि गव्हर्नमेंट होल्डिंग्स प्रायवेट लिमिटेड (GHPL) चे ५ टक्के कॅरिड इंटरेस्ट आहे.
पाकिस्तानसाठी का महत्वाचे ?
पाकिस्तान ऊर्जा संकट आणि आर्थिक अडचणीशी झुंझत आहे. महागड्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार घरगुती तेल आणि गॅस उत्पादनावर जोर देत आहे. हा शोध घरगुती संसाधनातून ऊर्जेचा पुरवठा आणि मागणीतील फरक कमी करणार असून देशाता हायड्रोकार्बन रिझर्व्ह वाढवणार आहे असे OGDCL ने म्हटले आहे.गेल्यावर्षी पाक सरकारने ५ नवीन एक्सप्लोरेशन डील साईन केले, नोव्हेंबर २०२५ मध्ये ४० ऑफशोर ब्लॉकचा लिलाव झाला, येथे ४ कंसोर्टियातून २३ बोली आल्या, सुरुवातीला ८ कोटी डॉलरचा करार झाला, जो पुढे जाऊन १ अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो.
