AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदी- पाक- तुर्की यांची आघाडी, भारताला सर्वात मोठा धोका ? काय आहे इस्लामिक NATO !

कतारवर अलिकडे इस्राईलने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील देशांना आता जाणीव झाली आहे की संकटाच्या घडीत अमेरिकेवर भरोसा ठेवू शकत नाहीत, त्यामुळे सौदी अरब आणि कतारसारखे देश पर्यायी सुरक्षा देणारी प्रणाली शोधत आहेत.

सौदी- पाक- तुर्की यांची आघाडी, भारताला सर्वात मोठा धोका ? काय आहे इस्लामिक NATO !
Islamic NATO
| Updated on: Jan 15, 2026 | 8:29 PM
Share

सौदी अरब आणि पाकिस्तान दरम्यान सप्टेंबर 2025 मध्ये झाल्या संरक्षण कराराने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारताची देखील चिंता वाढली आहे. या करारांतर्गत जर दोन्ही देशांपैकी कोणा एका देशावर हल्ला झाला तर त्याला दुसरा देश आपल्या वरील हल्ला मानेल. या करार थेट NATO च्या आर्टिकल-5 सारखा आहे. ज्यात कोणा एका सदस्यावरील हल्ला संपूर्ण गठबंधनावरीव हल्ला मानला जातो. याच कारणामुळे या कराराला अनेक विशेषतज्ज्ञ ‘इस्लामिक NATO’ च्या दिशेचे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे.

ब्लूमबर्गसह अनेक आंतरराष्ट्रीय अहवालानुसार आता या त्रिपक्षीय आरखड्यानुसार तुर्कीत देखील सामील होण्याची आशा केली जात आहे. जर असे झाले तर सौदी अरब, पाकिस्तान आणि तुर्की मिळून एक सारखा सैन्य- राजकीय ब्लॉक तयार करु शकतात. ज्याचा परिणाम केवळ मध्य पूर्वेत नाही तर भारत, इस्राईल, युरोप आणि आशियापर्यंत जाणवू शकतो.

सौदी-पाकिस्तान सामंजस्य करारात खास काय ?

17 सप्टेंबर 2025 मध्ये सौदी काऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ही डफेन्स डिल झाली आहे. यात करारांतर्गत दोन्ही देश एक- दुसऱ्याची सार्वभौमतत्व, सुरक्षा, क्षेत्रीय अखंडतेच्या संरक्षणासाठी संयुक्त रुपाने कार्यरत असतील.

या करारातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे गरज पडल्यास पाकिस्तान त्याच्या आण्विक सुरक्षा पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सहकार्य देखील सामायिक करू शकतात. हेच कारण आहे की या डीलला केवळ एक सामान्य संरक्षण सहकार्य न मानत, एक नवी सैन्य आघाडीची पायाभरणी मानली जात आहे. सौदी अरब अनेक वर्षे क्षेत्रीय सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून होता. तर पाकिस्तान आधीच आण्विक शक्ती संपन्न देश आहे. या दोन्ही देशातील सामंजस्य करार आणि शक्ती संतुलनाची दिशेला बदलणारा ठरणारा मानला जात आहे.

तुर्कीच्या प्रवेशाने तंत्रज्ञान आणि सैन्याला ताकद मिळणार

तुर्की हा संभाव्य ‘इस्लामिक NATO’ चा सर्वात मोठा स्तंभ ठरु शकतो. तुर्की न केवल नाटोचा सदस्य आहे , तर अमेरिकेनंतर नाटोतच दुसरी सर्वात मोठे लष्कर बाळगणारा देश आहे. तुर्कीची ड्रोन टेक्नॉलॉजी, संरक्षण उत्पादन क्षमता आणि सैन्य प्रशिक्षण जागतिक स्तरावर चांगले असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेशी वाढती दरी आणि पर्यायी सुरक्षा

तुर्कीने आधीच पाकिस्तानच्या F-16 फायटर जेट अपग्रेड केले आहे. पाकिस्तानचे नौदल तसेच वायूदलाच्या आधुनिकीकरणात तुर्की मदत करत आहे. याशिवाय तुर्कीने त्याची ड्रोन तंत्रज्ञान देखील पाकिस्तान आणि सौदी अरबला दिले आहे. तुर्की स्वत:ला युरोप, आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेशी जोडणारी एक जागतिक सैन्य ताकद म्हणून स्थापन करु इच्छीत आहे. याच कारणाने या आघाडीला त्याच्या धोरणात्मक ओळखीचा विस्तार मानला जात आहे.

कतारवरील इस्राईल हल्ल्यानंतर अरब देशांना आता जाणीव झाली आहे की संकटाच्या घडीत अमेरिकेची प्रतिक्रीया मर्यादित असू शकते, त्यामुळे सौदी अरब आणि कतार सारखे देश पर्यायी सुरक्षा देणारी प्रणाली शोधत आहेत.

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.