मी असं काही अजिबात करणार नाही…. या मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूरसोबत किसिंग सीन करण्यास दिला साफ नकार

अभिनेते ऋषी कपूर हे नेहमीच त्यांच्या अभिनयाने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. 70-80 च्या दशकात ऋषी कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असत. त्यांच्या एका चित्रपटात किसिंग सीन होता. जो करण्यास एका अभिनेत्रीने साफ नकार दिला होता. आणि ती अभिनेत्री ही एक मराठी अभिनेत्री होती. पण या चित्रपटानंतर अभिनेत्रीचं नशीब बदललं.

मी असं काही अजिबात करणार नाही.... या मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूरसोबत किसिंग सीन करण्यास दिला साफ नकार
wallpaper padmini kolhapure
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 3:50 PM

अभिनेते ऋषी कपूर हे नेहमीच त्यांच्या अभिनयाने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. 70-80 च्या दशकात ऋषी कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असत. बोल्ड सीन्स हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना ज्या पद्धतीने सादर केलं ज्याचं त्यामुळे सर्वच हैराण असायचे. त्यांचा असाच एक चित्रपट जो त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री ऋषी कपूरसोबत झळकली होती. तसेच तिने ऋषी कपूर यांच्यासोबत रोमँटीक सीन करण्यासाठी साफ नकार दिला होता.

ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला

ऋषी कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘प्रेम रोग’ हा देखील त्यांच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत. प्रेम रोग हा चित्रपट ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांनी बनवला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत 17 वर्षीय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे झळकल्या होत्या. त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.


‘असं काही मी करणार नाही….’

या चित्रपटात त्यांचा एक रोमॅंटीक सीनही होता. पण तो करण्यास त्यांनी साफ नकार दिला होता. पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या “हे सगळं करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. चित्रपटात एक किसिंग सीन होता. पण मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. असं काही मी करणार नाही असं स्पष्ट सांगतिलं होतं” एवढंच नाही तर या चित्रपटा ऋषी कपूरला पद्मिनी यांना कानाखाली मारयची होती. तेव्हा सीन परफेक्ट मिळावा म्हणून राज कपूर हे सतत रिटेक घेत होते. सीन परफेक्ट मिळवण्याच्या प्रयत्नात पद्मिनी यांनी चक्क 8 चापट माराव्या लागल्या.

चित्रपटातील पद्मिनी यांच्या अभिनयाने लोक प्रभावित झाले  होते

पण प्रेम रोग मधील पद्मिनी यांच्या अभिनयाने लोक प्रभावित झाले होते. या चित्रपटाने तिला स्टार बनवले. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने ऋषी कपूर सारख्या सुपरस्टारच्या उपस्थितीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. दिग्दर्शक राज कपूर यांना चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कारही मिळाले होते. त्यानंतर पद्मिनी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली.