या मुस्लिम अभिनेत्याने पाकिस्तानात जाऊन त्यांची बदनामी केली; थेट प्रवेशावर बंदी
बॉलिवूडचा असा एक मुस्लिम अभिनेता ज्याने पाकिस्तानात जाऊन भारताचे कौतुक केले होते, आणि त्यानंतर पाकिस्तानी लोकांचीच बदनामी केली. त्यानंतर या अभिनेत्याला पाकिस्तानात एन्ट्रीच बंद केली.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला यामुळे सगळा देशच हादरला. जि हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून देशात संतापाचे वातावरण आहे. देशात सर्वत्र पाकिस्तानला धडा शिकवण्याची चर्चा आहे तशी मागणीच करण्यात येत आहे. चित्रपटातील कलाकारही आपला राग व्यक्त करत आहेत. पण तुम्हाला बॉलिवूडचा असा एक मुस्लीम अभिनेता ज्याने चक्क पाकिस्तानात जाऊन त्यांची बदनामी केली होती.
पाकिस्तानात जाऊन त्यांचीच बदनामी केली
हिंदी चित्रपटांमध्ये असे अनेक खलनायक, नायक झाले आहेत, ज्यांनी नायकाच्या भूमिकेपेक्षा खलनायकाच्या भूमिकेसाठी जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. पण या अभिनेत्याने सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका अगदी चोख बजावल्या. या अभिनेत्याला दोन्ही भूमिकांमध्ये लोकांनी पसंत केलं. हा अभिनेते म्हणजे फिरोज खान. ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. कधी नायकाच्या भूमिकेत दिसले, तर कधी खलनायकाच्या. तथापि, 2006 साल एक घटना खूप व्हायरल झाली आहे, जेव्हा त्याला पाकिस्तानने आमंत्रित केले होते.
- Feroz Khan
मनीषा कोईरालावर टिप्पणी केल्यामुळे अभिनेता संतापला
फिरोज खान त्यांचा भाऊ अकबर खान यांच्या ‘ताजमहाल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानला गेले होते. खरंतर, 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ताजमहाल: अॅन इटरनल लव्ह स्टोरी’मध्ये अनेक पाकिस्तानी स्टार्सनीही काम केलं होतं. फिरोज खान तिथे पोहोचले तेव्हा एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिथे ते इतर पाकिस्तानी स्टार्सनाही भेटले.
पाकिस्तानातील पार्टीत सर्वांसमोर भारताचे कौतुक
पाकिस्तानमधील त्या पार्टीमध्ये जेव्हा फिरोज खान आणि अँकर फख्र-ए-आलम यांच्याशी भांडण झाले. तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. असे म्हटले जाते त्या पार्टीत मनीषा कोईरालावर टिप्पणी करण्यात आली होती. हा वाद नर्माण झाला होता. तेव्हा फिरोज खान यांनी त्या पार्टीत सर्वांसमोर पाकिस्तानातच भारताचे कौतुक केले. पार्टीत त्यांनी म्हटलं “आमच्या देशात (भारत) मुस्लिम प्रगती करत आहेत कारण तो एक धर्मनिरपेक्ष देश आहे”

Feroz Khan
“मुस्लिम लोकच मुस्लिमांना मारण्यात व्यस्त आहेत”
फिरोज खान इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान इस्लामच्या नावाखाली निर्माण झाले होते, पण इथे मुस्लिम लोकच मुस्लिमांना मारण्यात व्यस्त आहेत.” त्यांनी पार्टीत हेही स्पष्ट केले की ते स्वतःच्या मर्जीने पाकिस्तानात आलेले नाहीत. त्याला इथे बोलावण्यात आले आहे.
फिरोज खानच्या बोलण्याने परवेझ मुशर्रफ आणि तिथल्या लोकांना खूप दुखावले. बॉलिवूड अभिनेत्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. अशा परिस्थितीत, त्यावेळी राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांनी फिरोज खान यांच्यावर राग काढण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला.
पाकिस्तानात नो एन्ट्री
परिणामी फिरोज खान यांना पाकिस्तानचा व्हिसा नाकारण्यात आला. तसेच, परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या पाकिस्तानात त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. त्यानंतर फिरोज खानही कधी तिथे गेले नाही. फिरोज खान यांचे 2009 मध्ये निधन झालं. ते शेवटचे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटात दिसले होते.
