
Pyari Maryam Death : 2025 मध्ये अनेक दिग्गज व्यक्तींनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, आणखी एका मोठ्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.. प्रसिद्ध पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार आणि इन्फ्लुएंसर अभिनेत्री प्यारी मरियम हिचं निधन झालं आहे. ज्यामुळे तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर काही वेळातच मरियम हिने अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे तिच्या कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्यारी मरियम सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि सक्रिय होती. तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांना खूप आवडायचे. तिने पती अहसान अलीसोबत अनेक व्हिडिओ देखील शेअर केले. रिपोर्टनुसार, गुरुवारी मरियम हिच्या पतीने इन्स्टाग्रामवर एक मन विचलित करणारी पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर करत अहसान म्हणाला, त्यांच्या कुटुंबासाठी ‘अकल्पनीय नुकसान’ आहे आणि या कठीण काळात दया, क्षमा आणि धैर्यासाठी सर्वांना प्रार्थना करण्यास सांगितलं.
मरियमच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करताना सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं फातिमा जाफरी हिने गर्भधारणेच्या नाजूकतेवर प्रकाश टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, मरियम हिची प्रकृती अचानक खालावली. अशात तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं… जेथे डॉक्टरांनी मरियम हिचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केलं… पण अनेक प्रयत्न करुन देखील जुळ्या मुलांना जन्म देताना त्यांचं निधन झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, डॉक्टर तिच्या न जन्मलेल्या जुळ्या मुलांनाही वाचवू शकले नाहीत. याघटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
लाखो लोकांचं प्रेम मिळालेली, प्यारी मरियम तिच्या मनाला आनंद देणारी आणि सतत हसऱ्या स्वभावासाठी ओळखली जात असे. तिचा आशावादी दृष्टिकोन, दयाळू वर्तन आणि प्रामाणिकपणा यामुळे ती लाहोरच्या सर्वात आवडत्या डिजिटल निर्मात्यांपैकी एक बनली होती.
मरियम हिने पती अहसान अलीसोबत जुळी मुलं होणार असल्याचा आनंद तिच्या चाहत्यांसह शेअर केला. चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण अखेर मरियम पतीला ऐकट्याला सोडून निघून गेली. आता अशा परिस्थितीत, मरियमचे समर्थक सोशल मीडियावर त्यांचे शोक, प्रार्थना आणि तिचे फोटो शेअर करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.