28 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया स्टारची गोळ्या झाडून हत्या, CCTV फुटेज समोर

आता सेलिब्रिटींप्रमाणेच सोशल मीडिया स्टार देखील चर्चेत असतात. आता 28 वर्षीय सोशल मीडिया स्टारची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

28 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया स्टारची गोळ्या झाडून हत्या, CCTV फुटेज समोर
| Updated on: Aug 17, 2026 | 1:00 PM

पाकिस्तानातून एक धक्कादायक बाकमी समोर येत आहे. 28 वर्षीय लोकप्रिय टिकटॉकर शमसू बीबी हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, शमसू बीबी ही सोशल मीडियावर आयेशा गिलमाना या नावाने प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी घडना घडली आहे. इस्लामाबाद येथील टॅक्सिला शहरात हल्लेखोरांना शमसू बीबी हिच्यावर निशाणा साधला आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शमसू बीबी हिची 15 वर्षीय लहान बहीण गंभीर जखमी आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

घडलेल्या घटनेनंतर शमसू बीबी हिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या काही वेळेपूर्वी शमसू बीबी हिला काशी नावाच्या एका व्यक्तीचा फोन आलेला, त्या व्यक्तीने शमसू बीबी हिला घराबाहेर बोलावलं. आरोप असे आहेत की, आयेशा हिला काशी नावाच्या व्यक्तीने तात्काळ बाहेर बोलावलं. त्यानंतर शमसू बीबी 15 वर्षीय बहीण असीमा आणि भाऊ नैमतुल्लाह यांच्यासोबत कारमधून बाहेर निघाली.

एका रिपोर्टनुसार, शमसू बीबी तिच्या भावंडांसोबत बाहेर येताच, कुटुंबियांनी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं. माहिती मिळताच वडील देखील रुग्णालयात पोहोचले, जेथे त्यांना मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली.

 

 

दुचाकी चालकांनी झाडल्या गोळ्या…

कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आणि नैमतुल्लाच्या माहितीनुसार, एका पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारचा पाठलाग केला आणि गोळीबार केला. हल्लेखोरांचं वय अंदाजे 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान होतं. गोळीबारादरम्यान आयेशाच्या मानेत गोळी लागली आणि गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती गाडी दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली; या अपघातात आयेशाची धाकटी बहीण असिमा गंभीर जखमी झाली.

संबंधित घटनाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, याआधी देखील आयेशा हिला अनेकदा धमक्या आल्या आहे. आयेशाच्या वडिलांना तक्रारीत असं देखील सांगितलं आहे की, काही आर्थिक वाद होते. आयेशा हिने केलेल्या आरोपांनुसार, कौसर आणि जावेदया व्यक्तींनी पैशांच्या परतफेडीबाबत तिच्यावर दबाव आणला आणि तिला धमकावलं. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, आयेशाने या प्रकरणाबाबत यापूर्वी इस्लामाबादमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलीस आता याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us