पलक – इब्राहिम यांनी दिली नात्याची कबुली? दोघांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Palak Tiwari | श्वेता तिवारीची लेक आणि सैफ अली खान याचा मुलगा दोघे रिलेशनशिपमध्ये, पलक - इब्राहिम यांनी दिली नात्याची कबुली? व्हिडीओ तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक - इब्राहिम यांच्या नात्याची चर्चा...

पलक - इब्राहिम यांनी दिली नात्याची कबुली? दोघांचा तो व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 10, 2024 | 2:01 PM

मुंबई | 10 मार्च 2024 : अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरला आहे. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं. पण अनेकदा इब्राहिमसोबत स्पॉट केल्यानंतर पलक स्वतःचा चेहरा लपवताना दिसली. पण आता पलक आणि इब्राहिम यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पलक आणि इब्राहिम यांच्या व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये पलक आणि इब्राहिम एका कारमध्ये एकत्र दिसत आहेत. शनिवारी रात्री पलक आणि इब्राहिम यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. कारमध्ये पलक, इब्राहिम याच्यासोबत गप्पा मारताना दिसत होती. एवढंच नाहीतर, इब्राहिम, पलक हिला गर्दीत प्रॉटेक्ट करताना देखील दिसला.
दोघांमधील केमिस्ट्री पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे की, दोघांमध्ये नातं घट्ट आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते देखील आनंदी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक आणि इब्राहिम यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

 

 

पलक आणि इब्राहिम यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘आता हे नातं पक्क समजायचं..?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडला नवीन जोडी भेटली..’ याआधी देखील दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम दोघे प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलं असल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. पलकच्या आईबद्दल सांगायचं झालं तर, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

श्वेता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली. आता श्वेता चर्चेत नसून अभिनेत्रीची लेक पलक तिवारी तुफान चर्चेत आहे. तर इब्राहिम अभिनेता सैफ आली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा आहे. इब्राहिम कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी का जान’ सिनेमातून पलक चाहत्यांच्या भेटीस आली. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. वयाच्या 23 व्या वर्षी पलकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.