AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life experience | सावत्र वडील करायचे अभिनेत्रीची मारहाण; त्रासलेल्या मुलीची अवस्थापाहून आईने उचललं मोठं पाऊल

Life experience | सावत्र वडील करायचे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ... अभिनेत्रीच्या आईचा दावा; आज 'ही' अभिनेत्री आईसोबत जगतेय आनंदी आयुष्य... अभिनेत्री आईच्या पाऊलांवर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा करत आहे प्रयत्न

Life experience | सावत्र वडील करायचे अभिनेत्रीची मारहाण; त्रासलेल्या मुलीची अवस्थापाहून आईने उचललं मोठं पाऊल
| Updated on: Oct 08, 2023 | 5:22 PM
Share

मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं पहिलं लग्न अपयशी ठरल्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर काही वर्ष अभिनेत्रींनी दुसऱ्या पतीसोबत सुखी संसार केला. पण काही वर्षांनंतर सुखी संसाराचं चित्र पूर्णपणे बदललं. दुसऱ्या लग्नामुळे मुलांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. असंच काही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्यासोबत देखील झालं. श्वेता तिवारी हिने पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत केलं. पण त्यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. दोघांना एक मुलगी देखील आहे. राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांच्या मुलीचं नाव पलक तिवारी असं आहे.

पलक हिची आई श्वेता तिवारी आणि वडील राजा चौधरी यांची भेट एका भोजपुरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. भेटीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर दोघांमधील वाद वाढू लागले. श्वेता हिने राजा याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केलं. पण सावत्र वडील पलक हिला मारहाण करण्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली. एवढंच नाही, सावत्र वडील अभिनव, पलक हिला मॉडेलचे अश्लील फोटो दाखवायचा. त्याचप्रमाणे तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करायचा, असा दावा श्वेताने केला होता.

सवत्र वडिलांकडून मुलीला होत असलेला त्रास पाहून श्वेता तिवारी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. आज पलक तिची आई श्वेता तिवारी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात..

पलक तिवारी आईच्या पाऊलांवर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. पलक हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चाहते आता पलक तिवारी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.

पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील पलक हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर