Palash Muchhal : पलाश मुच्छलबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राने केले होते गंभीर आरोप

पलाश मुच्छल याने सिद्धेश भोळे, अश्विनी पिंपळे आणि श्रेयस मिथारे यांच्याद्वार कोर्टात धाव घेतली होती. त्याने स्मृती मानधना हिचा मित्रा विज्ञान माने याच्याविरोधात दावा दाखल केला होता. मुच्छल आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये बदनामीकारक विधाने केल्याबद्दल नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी मनाई आदेश यांची मागणी केली होती. आता कोर्टाने या खटल्यात महत्वाचा निर्णय दिला आहेय

Palash Muchhal : पलाश मुच्छलबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राने केले होते गंभीर आरोप
पलाश मुच्छल
Image Credit source: social media
| Updated on: Feb 14, 2026 | 8:25 AM

भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचं संगीतकार पलाश मुच्छलशी (Palash Muchhal) 23 नोव्हेंबरला लग्न होणार होतं. मात्र लग्नाच्या दिनशीच ते पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर काही दिवसांनी स्मृतीनेच हे लग्न मोडल्याची घोषणा केली. यामुळे स्मृती पलाश दोघेही चर्चेत होते. मात्र हे प्रकरण इथेच थांबल नाही कारण काही दिवसांपूर्वीच स्मृतीचा मित्र विान माने याने पलाशवर अनेक आरोप केले तसेच आर्थिक फसवणूक झाल्याचाही दावा केला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माता विज्ञान माने याला, गायक-संगीतकार पलाश मुच्छल आणि त्यांच्या आईविरुद्ध मीडिया मुलाखतींमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कथितपणे बदनामीकारक विधाने करण्यास मनाई केली आहे.
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश देताना म्हटले की, माने यांच्या मुलाखतीचा आधार 23 नोव्हेंबर 2025 ची घटना (स्मृती-पलाशचं ठरलेलं लग्न, जे नंतर मोडलं) होती. जी माझ्या मते प्रथमदर्शनी संबंधित नाही, विशेषतः जेव्हा वादी (मुच्छल) आणि प्रतिवादी क्रमांक 1 (माने) यांच्यात व्यावसायिक वाद आहे.’ असं त्यांनी नमूद केलं.

स्मृतीच्या मित्राला कोर्टाने फटकारलं

पलाश मुच्छल याने त्याचे वकील सिद्धेश भोळे, अश्विन पिंपळे आणि श्रेयस मिठारे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. त्याने स्मृती मानधना हिचा मित्रा विज्ञान माने याच्याविरोधात दावा दाखल केला होता. मुच्छल आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये बदनामीकारक विधाने केल्याबद्दल नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी मनाई आदेश यांची मागणी केली होती. माने याच्या मुलाखतींमुळे ‘पालश आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला’ असे म्हणत वकिलांनी तात्काळ अंतरिम एकतर्फी दिलासा मागितला.

समोर आलेल्या माहितीनुसार, विज्ञान माने हा स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र आहे आणि त्याने पलाश मुच्छलच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पलाशने 40 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप विज्ञान मानेने केला होता. विज्ञान हाँ व्यवसायाने तो चित्रपट फायनान्सर आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांनी त्याची पलाशशी ओळख करून दिली होती. परंतु स्मती आणि पलाशचं लग्न मोडल्यानंतर, विज्ञानने दावा केला की पलाशने त्याचे पैसे परत केले नाहीत. त्याच्या आरोपांनंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पलाश व स्मृतीचं लग्न मोडल्यावर माने याने मुलाखती दिल्या ज्या बदनामीकारक असल्याचे पलाश मुच्छलने म्हटलं होतं.

याप्रकरणीचत्याने कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा ठोकला होता. खंडपीठाने विद्यान माने याच्या मुलाखतींच्या प्रतींचा अभ्यास केला. ‘या प्रतींवरून हे स्पष्ट होते की वादी आणि प्रतिवादी क्रमांक 1 यांच्यात व्यावसायिक वाद आहे, असे कोर्टाने म्हटलं. पलाश मुच्छल याच्या पात्रतेची दखल घेत खंडपीठाने म्हटलं की, ‘ वादी (मुच्छल) हे भारतीय संगीत उद्योग आणि चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध संगीतकार आणि चित्रपट निर्माते आहेत… त्यांना सहा पुरस्कार मिळाले आहेत.’

कोर्टाचे आदेश 

‘एक मजबूत केस तयार झाल्याचं, कोर्चाने सर्व साहित्याचा अभ्यास केल्यानंतर मान्य केलं आणि त्यानंतर विद्यान माने याला फटकारलं. आधी मुलाखतींमध्ये दिलेल्या स्वरूपाचे कोणतेही संदर्भ किंवा संकेत यापुढे रोखण्याचे आदेश दिले. मुच्छल आणि त्याच्या आईवर हल्ला करणारे आणि प्रथमदर्शनी बदनामीकारक दिसणारे दावे करण्यास रोखण्याचे आदेश कोर्टाने दिले.

विज्ञानच्या आरोपानंतर पलाश मुच्छल याने इंस्टाग्रामवर यावर प्रतिक्रिया दिली होती आणि बदनामीकारक नोटीसबद्दल अधिकृत विधान शेअर केले. ‘माझे वकील श्रेयांश मिठारे यांनी सांगली येथील विद्यान माने यांना मानहानीबद्दलठी 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कारण त्याने माझी प्रतिष्ठा आणि कारकिर्द जाणूनबुजून खराब करण्याच्या उद्देशाने खोटे, हास्यास्पद आणि अत्यंत बदनामीकारक आरोप केले आहेत, असे पलाशने म्हटले होते.