AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे… परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?

बॉलिवूड दिग्गज परेश रावल यांनी लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांच्या खोडकर स्वभावाचे आणि क्रिकेटवरील प्रेमाचे किस्से शेअर केले आहेत. शेजारांना त्रास देण्यासाठी त्यांनी केलेल्या शरारती आणि क्रिकेट खेळताना झालेल्या गोंधळाचे वर्णन त्यांनी केले आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा मस्तीमय बालपण आणि आजच्या यशस्वी कारकिर्दीचा सुंदर मिलाफ दिसून येतो.

शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे... परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?
Paresh RawalImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 28, 2025 | 7:00 AM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी आपल्या कसदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं आहे. चरित्र नायक असो, व्हिलन असो की कॉमेडी भूमिका असो, परेश रावल यांच्या प्रत्येक भूमिका या संस्मरणीय ठरल्या आहेत. आपल्या अनोख्या आणि कसदार अभिनयाने त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या पडद्यावर अत्यंत ताकदीने वावरणारे परेश रावल हे लहाणपणी प्रचंड खोडकर होते. त्यांना सुरुवातीपासून क्रिकेट प्रचंड आवडायचं. ते उत्तम क्रिकेटही खेळायचे. त्यांच्या या क्रिकेट खेळाचा त्यांच्या शेजाऱ्यांना नेहमीच त्रास व्हायचा. शेजारी त्यांच्या खेळण्यावर वैतागायचे. त्यामुळे परेश रावल त्याचा बदला म्हणून असं काही करायचे की शेजारी थयथय नाचायचे. एका मुलाखतीत परेश रावल यांनीच हा खुलासा केला आहे.

परेश रावल यांनी लल्लन टॉपला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी आपल्या लहानपणीचे अनेक किस्से शेअर केले आहेत. आपल्या खोडकर स्वभावाचे किस्सेही सांगितले आहेत. तसेच सिनेमा, राजकारण, थिएटर आणि सेलिब्रिटींबाबत मनमोकळेपणे भाष्य केलं आहे. शाळेत असताना मी किती दुष्ट होतो, हे मित्रच सांगतात असं ते म्हणाले. प्रत्येक मुलगा हा दुष्ट असतोच. फक्त मी पकडला जायचो इतकंच, असं परेश रावल म्हणाले.

वाचा: राज कपूरची हिरोईन, विनोद खन्नाने फसवले; संकटात अडकलेल्या त्या अभिनेत्रीला मिथुन चक्रवर्तीने दिला होता आधार

केवळ मजाक मस्ती

त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक अजब किस्सा सांगितला. मला लहानपणी क्रिकेट खेळण्याचं प्रचंड वेड होतं. मी क्रिकेट खेळत असताना शेजारी त्यावर आक्षेप घ्यायचे. मला खेळू द्यायचे नाही. त्यामुळे मी त्यांच्या अंडरगारमेंट्समध्ये खाजखुजलीची पावडर टाकून द्यायचो, असं ते म्हणाले. शेजारी दुपारी खेळू देत नव्हते. इकडे खेळू नका, असं ते सांगायचे. मी म्हणायचो, ठिक आहे. ते घराच्या बाहेर अंडरगारमेंट्स वाळत घालायचे. त्यावेळी मी त्यांच्या अंडरगारमेंट्समध्ये खाजखुजली लावायचो, असा किस्सा त्यांनी सांगितला. ही केवळ मजाक मस्ती असायची, बाकी काही नाही, असंही ते म्हणाले.

टेस्ट क्रिकेट आवडते

तुम्ही सोसायटीच्या मुलांसोबत खेळू शकत नव्हता. तुमच्या आजूबाजूला गर्दी व्हायची. तुम्हाला रुमाल बांधून खेळावं लागायचं, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, “हो”, असं त्यांनी उत्तर दिलं. त्याच वेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला क्रिकेट खूप आवडतं का? यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही यार, इतकं नाही. पण आता तर हे आयपीएल वगैरे सगळं खूप दमवणारं झालंय.” त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की पाच दिवसांचं टेस्ट मॅच आवडतं का? यावर परेश यांनी लगेच उत्तर दिलं, “हो, टेस्ट क्रिकेट ही एक कला आहे. यात इनिंगची बिल्डअप होते,” असं ते म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.