AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीमध्ये परिणीती चोप्रा दिसली अत्यंत रोमँटिक मूडमध्ये, ‘ते’ फोटो व्हायरल

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा हा उदयपूरमध्ये पार पडला. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा विवाह सोहळा पार पडला.

दिवाळीमध्ये परिणीती चोप्रा दिसली अत्यंत रोमँटिक मूडमध्ये, 'ते' फोटो व्हायरल
| Updated on: Nov 13, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे दिल्लीमध्ये अत्यंत शाही थाटात लग्न झाले. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कुटुंबियांसोबत पोहचले. आता नुकताच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या पहिल्याच दिवाळीचे खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा दोघेही एकदम जबरदस्त लूकमध्ये दिसले.

लग्नानंतरची राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची ही पहिलीच दिवाळी आहे. परिणीती चोप्रा ही सध्या दिल्लीमध्ये असून चड्ढा कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचा रिलीज झालेला चित्रपट फ्लाॅप गेलाय. या चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना परिणीती चोप्रा ही मुळात दिसलीच नव्हती.

परिणीती चोप्रा आणि ही चड्ढा कुटुंबियांसोबत सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा हिने करवा चाैथचे खास फोटो शेअर केले होते. आता दिवाळी देखील परिणीती चोप्रा धमाकेदार पद्धतीने साजरी करताना दिसतंय. विशेष म्हणजे फोटोंमध्ये परिणीती चोप्रा ही रोमँटिक होताना दिसत दिसत आहेत.

एका फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याची किस घेताना दिसत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. अनेक वर्षे यांनी एकमेकांना डेट केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे मुंबईमध्ये अनकेदा स्पाॅट होताना दिसले. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक वर्षे सर्वांपासून लपवून ठेवले होते.

विशेष म्हणजे अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरला यांचा शाही विवाह सोहळा हा पार पडला. दिल्लीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा ही मुंबईमध्ये दाखल झाली. मात्र, लगेचच परत ती दिल्लीला रवाना झाली. चाहते परिणीती चोप्रा हिला चित्रपटात पाहण्यास इच्छुक आहेत. मात्र, परिणीती चोप्रा हिने लग्नानंतर अद्याप तिच्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात केली नाहीये.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....