Parineeti Chopra हिच्या वैवाहिक आयुष्याची एक झलक समोर, सासरी काय करते अभिनेत्री?

Parineeti Chopra | सासरी कसं आहे परिणीती चोप्रा हिचं आयुष्य? अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल.. २४ सप्टेंबर रोजी उदयपूर येथील लीला पॅलेस याठिकाणी शाही थाटात विवाहबंधनात अडकले राघव - परिणीती

Parineeti Chopra हिच्या वैवाहिक आयुष्याची एक झलक समोर, सासरी काय करते अभिनेत्री?
| Updated on: Oct 09, 2023 | 8:04 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबर रोजी उदयपूर येथील लीला पॅलेस याठिकाणी शाही थाटात लग्न केलं. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राघव आणि परिणीती यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं. पण लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर परिणीती दिल्लीत तिच्या सासरी आहे. अशात सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्याची एक झलक दाखवली आहे.

परिणीती चोप्रा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री वृत्तपत्रात सुडोकू सोडवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. परिणीती सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. शिवाय अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

लग्नानंतर परिणीती चोप्रा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राघव आणि परिणीती यांना एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

पण राघव आणि परिणीती यांच्यासोबतच दोघांच्या कुटुंबियांनी देखील यावर मौन बाळगलं होतं. अखेर १३ मे रोजी राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा झाल्यानंतर दोघे विवाहबंधना अडकणार असल्याची माहिती समोर आली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे.

परिणीती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.