‘पठाण’मध्ये देशाला वाचवणाऱ्या ‘अमोल’चं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; 126 किलो ते सिक्स पॅक ॲब लूक

अमोल या चित्रपटात JOCR या गुप्तचर यंत्रणेचा सदस्य असतो, जो देशाला वाचवण्यासाठी मदत करतो. 'पठाण'मधील आकाशच्या दमदार अभिनयाची जितकी चर्चा होत आहे, त्यापेक्षा जास्त त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनची होत आहे.

'पठाण'मध्ये देशाला वाचवणाऱ्या 'अमोल'चं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; 126 किलो ते सिक्स पॅक ॲब लूक
अभिनेता आकाश बठीजाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 6:37 PM

मुंबई: सध्या सर्वत्र शाहरुख खानच्या ‘पठाण’चीच चर्चा ऐकायला मिळतेय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. पठाणमधील कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होतंय. यामध्ये अभिनेता आकाश बठीजाने अमोलची भूमिका साकारली आहे. अमोल या चित्रपटात JOCR या गुप्तचर यंत्रणेचा सदस्य असतो, जो देशाला वाचवण्यासाठी मदत करतो. ‘पठाण’मधील आकाशच्या दमदार अभिनयाची जितकी चर्चा होत आहे, त्यापेक्षा जास्त त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनची होत आहे. पठाण चित्रपटात काम करण्यापूर्वी आकाशचं वजन 126 किलो इतकं होतं.

126 किलो वजन असलेल्या आकाशला पाहून कोणीच याचा विचार केला नसता की तो ॲक्शन चित्रपटात काम करू शकेल. मात्र प्रशिक्षक राजेंद्र धोले यांनी आकाशची मदत केली. त्यांच्या मदतीने आकाशने सहा महिन्यांत वजन कमी केलं. आता आकाशचे सिक्स पॅक ॲब्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हे सुद्धा वाचा

आकाशने याआधीही अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राच्या ‘इशकजादे’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये त्याने अर्जुनच्या खास मित्राची भूमिका साकारली होती. त्याने काही टीव्ही शोजमध्येही काम केलं आहे. ‘वीर शिवाजी’ आणि ‘अमिता का अमित’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. आता पठाण या चित्रपटामुळे आकाशला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

पठाण या चित्रपटाने आठ दिवसांत देशभरात 336 कोटी रुपये तर जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. यामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर या चित्रपटातून कमबॅक केलं आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.