Pathaan | शाहरुखचा ‘पठाण’ ठरला ‘हा’ मोठा विक्रम रचणारा पहिला बॉलिवूड चित्रपट

25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या 21 दिवसांत 'पठाण'ने 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता 22 व्या दिवशी हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे.

Pathaan | शाहरुखचा 'पठाण' ठरला 'हा' मोठा विक्रम रचणारा पहिला बॉलिवूड चित्रपट
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 1:27 PM

मुंबई: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या 21 दिवसांत ‘पठाण’ने 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता 22 व्या दिवशी हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. भारतात 500 कोटींची कमाई करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरल्याचं म्हटलं जात आहे. आता पठाणची टक्कर ‘बाहुबली 2’ या चित्रपटासोबत आहे. कारण एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने देशभरात 511 कोटी रुपये कमावले होते.

गेल्या 22 दिवसांची कमाई

पहिला दिवस- 57 कोटी रुपये दुसरा दिवस- 70.50 कोटी रुपये तिसरा दिवस- 39.25 कोटी रुपये चौथा दिवस- 53.25 कोटी रुपये पाचवा दिवस- 60.75 कोटी रुपये सहावा दिवस- 26.50 कोटी रुपये सातवा दिवस- 21 कोटी रुपये आठवा दिवस- 18.25 कोटी रुपये नववा दिवस- 15.65 कोटी रुपये 10 वा दिवस- 14 कोटी रुपये 11 वा दिवस- 23.25 कोटी रुपये 12वा दिवस- 28.50 कोटी रुपये 13 वा दिवस- 8.55 कोटी रुपये 14 वा दिवस- 7.75 कोटी रुपये 15 वा दिवस- 6.75 कोटी रुपये 16 वा दिवस- 5.95 कोटी रुपये 17 वा दिवस- 5.90 कोटी रुपये 18 वा दिवस- 11.25 कोटी रुपये 19 वा दिवस- 13 कोटी रुपये 20 वा दिवस- 4.20 कोटी रुपये 21 वा दिवस- 5.61 कोटी रुपये 22 वा दिवस- 4 कोटी रुपये (सुरुवातीचे ट्रेंड्स)

शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर या चित्रपटातून कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ‘पठाण’ची खूप उत्सुकता होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्ल होता.

हे सुद्धा वाचा

पठाणमध्ये ॲक्शन अवतारात दिसण्याविषयी शाहरुख म्हणाला होता, “मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.”

पठाणनंतर शाहरुख डंकी आणि जवान या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटात तो तापसी पन्नूसोबत भूमिका साकारणार आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो अटली दिग्दर्शित ‘जवान’मध्ये हटके भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी हिंदीसोबतच तमिळ तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.