शाहरुख खान याच्या ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तीन दिवसात इतक्या कोटींचं कलेक्शन

| Updated on: Jan 28, 2023 | 8:50 AM

सलग तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमाचा बोलबाला; शाहरुख खान याचा सिनेमा रचतोय विक्रमावर विक्रम... सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा

शाहरुख खान याच्या पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तीन दिवसात इतक्या कोटींचं कलेक्शन
शाहरुख खान याच्या 'पठाण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तीन दिवसात इतक्या कोटींचं कलेक्शन
Follow us on

Pathaan Box Office Collection Day 3: अभिनेता शाहरुख खान , जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमामा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पदार्पण करत असल्यामुळे चाहत्यांच्या उत्साह शिगेला पोहोचलेला असताना अनेक ठिकाणी सिनेमाने अनेक ठिकणी अनोखा विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे. पठाण देशभरात प्रदर्शनानंतर रोज नवे विक्रम रचत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त शाहरुखच्या पठाण सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने रेकोर्ड ब्रेक कमाई केली. शाहरुख खान याच्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांना मागे टाकलं आहे. सध्या सर्वांचं लक्ष पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर लागून आहे. सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्या दिवसांतील सुरवातीच्या आकड्यांबद्दल सांगायचं झालं तर, शुक्रवारी सिनेमाने जवळपास ३४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर आतापर्यंत सिनेमाने १६२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमाच्या कमाईचे अद्याप पूर्ण आकडे समोर आलेले नाहीत. त्यामुळे शनिवार आणि रविवार असल्यामुळे पठाण सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७०.५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पठाण सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. शाहरुख खानचा हा सर्वात मोठा हीट सिनेमा ठरला आहे. स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच शाहरुखच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची जादू पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी देखील अनेक संघटनांनी सिनेमाचा विरोध केला. पण त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही.