AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पठाण’ सिनेमाचे मेकर्स वादाच्या भोवऱ्यात; पाकिस्तानी गायकाचे गंभीर आरोप

'पठाण' सिनेमातील 'बेशर्म रंग' गाण्याचे पाकिस्तानसोबत कनेक्शन; एका पोस्टमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

'पठाण' सिनेमाचे मेकर्स वादाच्या भोवऱ्यात; पाकिस्तानी गायकाचे गंभीर आरोप
Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक
| Updated on: Jan 02, 2023 | 11:51 AM
Share

Pathaan Song Besharam Rang Controversy: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘पठाण’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या निशाण्यावर आला. गाण्यात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकीनी वादाचं कारण ठरली. भारतात दीपिकाने गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला कडाडून विरोध करण्यात झाला. अनेक राजकीय प्रतिक्रियांनी देखील वातावरण तापलं.

‘पठाण’ सिनेमाला होत असलेला विरोध पाहता सेंसर बोर्डाने देखील सिनेमाच्या मेकर्सना सिनेमात महत्त्वाचे बदल करण्यास सांगितलं. प्रदर्शनापूर्वीच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महत्त्वाचं म्हणजे दिवसागणिक सिनेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. आता थेट पाकिस्तानमधून सिनेमाच्या मेकर्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने सिनेमाच्या गाण्यावर गंभीर आरोप करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. पकिस्तानी गायक सज्जाद अलीने ‘बेशर्म रंग’ गाण्यावर कॉपीचे आरोप लावले आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सज्जदने अनेक वर्षांपूर्वीचं एक गाणं युजर्सना ऐकवलं. सध्या सज्जादचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

व्हिडीओमध्ये सज्जाद म्हणाला, ‘मी युट्यूबवर काही नवीन गाणी ऐकत होतो. तेव्हा मला माझं जवळपास २६ वर्ष जुनं एक गाणं आठवलं..’ सज्जादने गायलेल्या गाण्याचे बोल ‘अब के हम बिछडे’ असे आहेत. व्हिडीओमध्ये त्याने ‘पठाण’ सिनेमाच्या मेकर्स, निर्माते आणि गाण्याचं नाव न घेता ‘बेशर्म रंग’ गाण्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सज्जादचं गाणं ऐकल्यानंतर ‘बेशर्म रंग’ गाण्यावर चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत विरोध केला आहे. ‘पठाण’ सिनेमावर होणारे आरोप पाहता रुपेरी पडद्यावर सिनेमा कशी कामगिरी करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दीपिका आणि शाहरुख स्टारर ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ सिनेमातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात दीपिका आणि शाहरुख सोबतच अभिनेता जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.